आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीच्या एकूण 95.89 कोटी मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासांत, लसीच्या 65 लाख 86 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.04 % आहे; मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर

गेल्या 24 तासांत देशात 14,313 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (2,14,900) आतापर्यंतच्या एकूण बाधितांच्या संख्येच्या 0.63 %

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.48%) गेले 109 दिवस 3% पेक्षा कमी

Posted On: 12 OCT 2021 9:42AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसारगेल्या 24 तासांतकोविड प्रतिबंधक लसीच्या 65,86,092  मात्रा देण्यात आल्यामुळेभारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण 

मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 95.89  कोटी मात्रांचा  (95,89,78,049)   टप्पा  पार केला  आहेदेशभरात 93,66,392  सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसारलसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे 

 

HCWs

1st Dose

1,03,75,424

2nd Dose

90,36,583

 

FLWs

1st Dose

1,83,59,259

2nd Dose

1,53,98,857

 

Age Group 18-44 years

1st Dose

38,68,20,261

2nd Dose

10,40,73,546

 

Age Group 45-59 years

1st Dose

16,61,56,424

2nd Dose

8,38,76,362

 

Over 60 years

1st Dose

10,48,69,202

2nd Dose

6,00,12,131

Total

95,89,78,049

 

 

 गेल्या 24 तासांत 26,579  रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासूनआतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 

3,33,20,057 झाली आहे.

 परिणामीसध्याभारतातील रोगमुक्ती दर 98.04 % आहेमार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.

 

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळेगेले सलग 107  दिवस  नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून 

कमी असण्याचा कल कायम आहे.

 

गेल्या 24 तासांत,14,313 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली224  दिवसांमधील एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांची ही सर्वात कमी संख्या आहेदेशातील  कोविड सक्रीय रुग्णसंख्या

 सध्या 2,14,900  इतकी आहे आणि ही गेल्या 212  दिवसातील  सर्वात कमी रुग्णसंख्या आहेदेशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या 

संख्येच्या 0.63 %आहे.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहेगेल्या 24 तासांत देशात एकूण 11,81,766 चाचण्या करण्यात आल्यादेशात आतापर्यंत एकंदर 58 कोटी

 50  लाखांहून अधिक (58,50,38,043 ) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाचसाप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.48% असून गेले 109 दिवस हा दर 3%हून कमी राहिला आहे

तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.21 % आहे.  दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 43  दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग  126  दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

***

JaydeviPS/ SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1763180) Visitor Counter : 183