कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऊर्जा प्रकल्पांची मागणी पुरवण्यासाठी देशात पुरेसा कोळसा साठा असल्याचे कोळसा मंत्रालयाचे स्पष्टीकरण


वीजपुरवठा खंडित होण्याची भीती अनाठायी

या वर्षात कोळशापासूनच्या ऊर्जानिर्मितीत 24 टक्क्यांची वाढ

प्रचंड पाउस असतांना देखील कोल इंडिया लिमिटेड कडून, ऊर्जा क्षेत्राला 225 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा

Posted On: 10 OCT 2021 3:50PM by PIB Mumbai

 

देशातील ऊर्जा निर्मिती केंद्रांची गरज भागवू शकेल, एवढा पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय कोळसा मंत्रालयाने दिले आहे. वीजपुरवठा खंडित होण्याची भीती अनाठायी असून, असे काहीही होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या ऊर्जा प्रकल्पांकडे 72 लाख टन इतका कोळसा साठा असून आणखी चार दिवसांसाठी तो पुरेसा आहे. आणि कोल इंडिया लिमिटेडकडे आणखी 400 लाख टन साठा असुन त्याचा पुरवठा उर्जा केंद्रांना केला जात आहे.

यावर्षी देशांतर्गत, कोळशापासून ऊर्जानिर्मिती 24% ची वाढ झाली आहे. (सप्टेंबरपर्यंत) कोळसा कंपन्यांकडून होणाऱ्या कोळसा पुरवठ्यामुळेच ही वाढ शक्य झाली आहे. सध्या देशातल्या सर्व औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना दररोज, 18.5 लाख टन कोळसा लागतो. मात्र, यंदा पाउस लांबल्याने, कोळसा पुरवठ्यात अडचणी आल्या.प्रकल्पांमध्ये लागणाऱ्या कोळशाचा पुरवठा रोजच केला जातो.त्यामुळेच, कोळशाच्या उपल्ब्धतेबाबत कुठलीही भीती बाळगली जाऊ नये, असे कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. खरे तर, यंदाच्या वर्षात देशांतर्गत कोळसा उत्पादनामुळे कोळशाच्या आयातीला पर्याय उभा केला आहे.

देशभरात यंदा प्रचंड पाउस पडत असूनही, कोल इंडिया लिमिटेड ने उर्जा कंपन्यांना 255 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केला. यंदा सीआयएलने सर्वाधिक H-1 पुरवठा केला. सीआयएल  कडून  वीजनिर्मिती कंपन्यांना दररोज 14 लाख टन कोळशाचा पुरवठा केला जातो. पाउस कमी झाल्यानंतर लगेचच हा पुरवठा दररोज 15 लाख करण्यात आला असून लवकरच त्यात आणखी भर घातली जाणार आहे

देशांतर्गत कोळसा साठ्यामुळे देशात, मुसळधार पाउस, कोळशाच्या आयातीत घट, आणि कोळशाच्या च्या मागाणीत अचानक वाढ  अशा अडचणी असतांनाही, ऊर्जानिर्मितीला पाठबळ मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षात, कोळसा पुरवठ्यात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात, कोळशाच्या किमती वाढल्याने, आयात होणाऱ्या कोळशात सुमारे 30 % पर्यंत घट झाली आहे, मात्र देशांतर्गत कोळसा उत्पादन 24 टक्क्यांनी वाढले आहे.

देशात कोळशाची स्थिती समाधानकारक असून कोल इंडिया तर्फे दररोज, 2.5  लाख टन कोळसाबिगर वीजनिर्मितीही कंपन्यांना पाठवला जात आहे.

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1762690) Visitor Counter : 458