रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणा अंतर्गत सवलतींबाबतची अधिसूचना जारी
Posted On:
07 OCT 2021 10:32AM by PIB Mumbai
जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणा अंतर्गत, मालकांना जुनी आणि प्रदूषण करणारी वाहने काढून टाकण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या व्यवस्थेचा प्रस्ताव आहे. यात देखभाल आणि इंधन वापराचा खर्च जास्त आहे अशा जुन्या वाहनांचा समावेश आहे.
यानुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक जीएसआर अधिसूचना 720(E), 05.10.2021 रोजी भारतीय राजपत्रात जारी केली आहे. ती 1 एप्रिल 2022 पासून अंमलात येईल.
जुने वाहन मोडीत काढण्यासाठी प्रोत्साहन म्हणून, "सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट" सादर करून नोंदणीकृत वाहनासाठी मोटार वाहन करात सवलत दिली जाते. ती नोंदणीकृत वाहन मोडीत काढण्याच्या सुविधेद्वारे जारी केली जाते. ही सवलत खालीलप्रमाणे आहे.
(i) बिगर वाहतुक (वैयक्तिक) वाहनांच्या बाबतीत पंचवीस टक्क्यांपर्यंत आणि
(ii) पंधरा टक्क्यांपर्यंत, वाहतूक करणाऱ्या (व्यावसायिक) वाहनांच्या बाबतीत:
या सवलती वाहतूक वाहनांच्या बाबतीत आठ वर्षांपर्यंत आणि वाहतूक नसलेल्या वाहनांच्या बाबतीत पंधरा वर्षांपर्यंत उपलब्ध असतील.
राजपत्र अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
****
MC/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761686)
Visitor Counter : 314