पंतप्रधान कार्यालय
अभिनेते घनश्याम नायक आणि अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
06 OCT 2021 10:23AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेते घनश्याम नायक आणि अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु: ख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"गेल्या काही दिवसात, आपण दोन प्रतिभावान अभिनेते गमावले आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाद्वारे लोकांची मने जिंकली. घनश्याम नायक हे त्यांच्या बहुआयामी भूमिकांसाठी , विशेषतः 'तारक मेहता का उल्टा चष्मा ' या लोकप्रिय मालिकेतील भूमिकेसाठी नेहमी स्मरणात राहतील. ते अत्यंत प्रेमळ आणि नम्र होते.
आपण अरविंद त्रिवेदी यांना गमावले आहे, ते केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते तर लोकसेवेचीही त्यांना आवड होती. रामायण या दूरदर्शनवरील मालिकेतील भूमिकेसाठी ते भारतीयांच्या अनेक पिढ्यांच्या कायम स्मरणात राहील. दोन्ही अभिनेत्यांच्या कुटुंबिय आणि प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती. "
***
MC/Sushma/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761333)
Visitor Counter : 250
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam