पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचे केले कौतुक
सणासुदीच्या काळात खादी आणि हस्तकला उत्पादने खरेदी करण्याचे केले आवाहन
Posted On:
03 OCT 2021 5:24PM by PIB Mumbai
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली म्हणून लेह, लडाखमध्ये प्रदर्शित केलेल्या जगातील सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वज तयार करण्याच्या (225 फूट उंची आणि 150 फूट रुंदी असलेल्या) खादी ग्रामोद्योग आयोगाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:
"खादीविषयी विशेष आत्मियता असणाऱ्या आदरणीय बापूंना ही एक अनोखी श्रद्धांजली आहे.
या सणासुदीच्या काळात, खादी आणि हस्तकला उत्पादनांना आपल्या जीवनातील अविभाज्य घटक भाग बनवण्याचा विचार करा आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प बळकट करा."
***
M.Chopade/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760624)
Visitor Counter : 305
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam