आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 87 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 1.02 कोटी मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.81%, मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर

गेल्या 24 तासात 18,795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 201 दिवसांनंतर 20000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद.

उपचाराधीन रुग्णांची संख्या (2,92,206) एकूण रुग्णसंख्येच्या 0.87%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.88%) गेल्या 95 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

Posted On: 28 SEP 2021 10:46AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2021

 

गेल्या 24 तासात 1,02,22,525 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 87 कोटी (87,07,08,636) मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 84,62,957 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs

1st Dose

1,03,72,006

2nd Dose

88,53,567

 

FLWs

1st Dose

1,83,50,151

2nd Dose

1,48,83,125

 

Age Group 18-44 years

1st Dose

35,28,56,642

2nd Dose

7,71,77,130

 

Age Group 45-59 years

1st Dose

15,76,57,008

2nd Dose

7,49,24,270

 

Over 60 years

1st Dose

10,03,78,855

2nd Dose

5,52,55,882

Total

87,07,08,636

गेल्या 24 तासांत 26,030 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,29,58,002 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.81% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा रुग्ण बरे होण्याचा हा सर्वोच्च दर आहे. 

केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 93 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्ण नोंदीचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 18,795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 201दिवसांनंतर 20000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,92,206 असून देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.87% आहे. तसेच ही रुग्णसंख्या गेल्या 192 दिवसातील निचांकी आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 13,21,780  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 56.57 (56,57,30,031) कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.88% असून गेल्या 95 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.42% असून, गेले सलग 29 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 112 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

* * *

S.Thakur/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1758785) Visitor Counter : 235