पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

प्रविष्टि तिथि: 20 SEP 2021 9:59PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या धोरणात्मक भागीदारी परिषदेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांसह , सध्या सुरु असलेल्या विविध द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

भारतात उर्जा,माहिती तंत्रज्ञान,संरक्षण उत्पादन यासह महत्वाच्या इतर क्षेत्रामध्ये  सौदी अरेबियाकडून मोठ्या  गुंतवणूकीची अपेक्षा  पंतप्रधानांनी व्यक्त केली.

अफगाणीस्तानमधल्या परिस्थितीसह प्रादेशिक घडामोडींवर या बैठकीत विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले.

कोविड -19 महामारीच्या काळात सौदी अरेबियामधल्या भारतीय समुदायाच्या कल्याणाची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी, सौदी अरेबियाचे विशेष आभार मानत प्रशंसा केली.

सौदी अरेबियाचे राजे आणि युवराज  यांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

***

Jaydevi PS/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1756678) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam