श्रम आणि रोजगार मंत्रालय
ई-श्रम पोर्टलचा आरंभ झाल्यापासून 27 लाखांहून अधिक असंघटित कामगारांनी त्यावर केली नोंदणी
या पोर्टलवर असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी भारत सरकार सर्व राज्य सरकारे आणि इतर हितसंबंधितांना सक्रिय सहकार्य आणि मदत करत आहे: श्री. रामेश्वर तेली
Posted On:
09 SEP 2021 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2021
कामगार कल्याण आणि रोजगार मंत्रालय ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विविध शिबिरे आयोजित करत आहे.
विविध मंत्रालयांमधून कार्यरत असलेल्या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी आज नवी दिल्लीतील श्रम शक्ती भवनात अशाप्रकारचे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात आज 80 हून अधिक कामगारांनी पोर्टलवर नोंदणी केलेली असण्याची शक्यता आहे.
या शिबिराचे उद्घाटन करताना श्रम,रोजगार आणि पेट्रोलियम,नैसर्गिक वायू राज्यमंत्री श्री. रामेश्वर तेली यांनी सर्वांना पोर्टलवर नोंदणी करण्यास तसेच पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांना मिळणाऱ्या लाभांची माहिती इतरांना सांगण्याचे आवाहन केले.
श्री. तेली म्हणाले की, सर्व असंघटित कामगारांचा राष्ट्रीय माहितीपट(डेटाबेस) तयार केल्याने सरकारला असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्यास आणि शेवटच्या टप्प्यावरील कामगारापर्यंत त्याचे वितरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार गेल्या महिन्यात (shorturl.at/fxLU2) सुरू करण्यात आलेले ई-श्रम हे पोर्टल हे लक्षणीय बदल घडवून आणणारे ठरेल असे सांगत श्री. तेली यांनी पुढे अधिक माहिती देताना सांगितले, की आतापर्यंत 27 लाखांहून अधिक असंघटित कामगारांनी नोंदणी यावर केली आहे आणि भारत सरकार या पोर्टलवर कामगारांची नोंदणी करण्यासाठी सर्व राज्य सरकार आणि इतर हितसंबंधितांना सक्रियपणे सहकार्य करत आहे.
लाभांसंदर्भात आधिक माहिती देताना राज्यमंत्र्यांनी सांगितले, की नोंदणी करणाऱ्यांसाठी 2 लाख रुपये अपघाती विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. जर एखादा कामगार ई श्रम( e-SHRAM) पोर्टलवर नोंदणीकृत असेल आणि त्याला अपघात होऊन तो मृत्यूमुखी पडला किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले तर तो 2.0 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आले तर 1.0 लाख रुपये भरपाई मिळण्यास पात्र असेल तसेच नोंदणी केल्यावर कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर ( सर्वसमावेशक खाते क्रमांक)दिला जाईल, ज्यामुळे सामाजिक सुरक्षा योजना, रेशन कार्ड इत्यादींच्या सुविहितेसाठी विशेष करून स्थलांतरित कामगारांसाठी हे साध्य करणे सोपे ठरेल.
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1753562)
Visitor Counter : 275