आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 तथ्य विरुद्ध वास्तव
INSACOG द्वारे जनुकीय अनुक्रमात उत्तरोत्तर वाढ झाली आहे
येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये व्हेरिएन्ट्स ऑफ कन्सर्न (व्हीओसी) चे प्रकार शोधण्यासाठी पुढाकार
राज्यांना क्रमवारीसाठी पुरेसे नमुने पाठवण्याचा वारंवार सल्ला
Posted On:
06 SEP 2021 11:18AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2021
काही प्रसारमाध्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार असा आरोप करण्यात आला आहे की, जनुकीय अनुक्रम आणि कोविड –19 रोगाचे प्रकरण वाढत असताना देखील भारतात झपाट्याने घट झाली. अहवालात पुढे असा दावा करण्यात आला आहे की देशाने आजपर्यंत नमुन्यांची संख्या कमी केली आहे.
असे स्पष्ट करण्यात आले आहे की अहवालात नमूद केलेल्या अनुक्रमांची संख्या भारतीय कोविड–19 जनुकीय क्रमनिर्धारित पोर्टलवरून (http://clingen.igib.res.in/covid19genomes/) घेतली आहे. IGIB SFTP यामध्ये विश्लेषण केलेले अनुक्रम नमुन्यांच्या संकलन तारखेनुसार आहेत आणि एका विशिष्ट महिन्यात अनुक्रमित नमुन्यांची संख्या ते दर्शवित नाहीत. INSACOG च्या कन्सोर्टियम प्रयोगशाळांच्याद्वारे अनुक्रमित नमुने देखील संबंधित राज्यांनी पाठविलेल्या नमुन्यांवर आधारित असतात.
महिन्यानुसार अनुक्रमित नमुन्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :
पुढे, INSACOG च्या प्रयोगशाळांद्वारे नमुन्यांचे प्रारंभिक भाग क्रमवारी हे येणाऱ्या प्रवाशांमधील व्हेरिएन्ट्स ऑफ कन्सर्न (VOC) शोधण्यासाठीचे होते आणि शिवाय व्हेरिएन्ट्स ऑफ कन्सर्न (VOC) असलेला कोणी एखादा प्रवासी INSACOG ला प्रारंभ झाल्यापासून (26 डिसेंबर 2020) गेल्या महिन्याभरात (28 दिवसांचा दुप्पट उष्मायन कालावधी) देशामध्ये आला असल्यास ते पाहणे. देशामध्ये व्हेरिएन्ट्स ऑफ कन्सर्न (VOC) अस्तित्त्वात असल्यास ते शोधण्यासाठी, (आरटी – पीसीआर द्वारे) 5 % पॉझिटिव्ह अनुक्रमासाठी लक्ष्यित करण्यात आले होते, दोन्ही उद्दिष्टे जानेवारी 2021 अखेर साध्य झाली.
महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली सारख्या अनेक राज्यांनी फेब्रुवारी महिन्यात वाढती संख्या दर्शविण्यास सुरुवात केली आणि प्रतिसाद म्हणून, विदर्भातील 4 जिल्हे महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि पंजाबच्या सुमारे 10 जिल्ह्यांमध्ये अनुक्रम वाढविण्यात आला.
शिवाय, दरमहा 300 नमुने किंवा 10 जनुकीय क्रमनिर्धारण संख्या निश्चित केलेली नाही. या अचूक संख्या आहेत आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सर्व भागांमधून भौगोलिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी सेंटिनल साइट्सची ठिकाणे ओळखण्याची मुभा देण्यात आली आहे.
सेंटिनल साइट्स व्यतिरिक्त, राज्यांना लस ब्रेक-थ्रू, पुन्हा होणारे संक्रमण किंवा अन्य असामान्य सादरीकरण नमुने INSACOG प्रयोगशाळांमध्ये पाठविण्याचा पर्याय आहे.
शिवाय, जनुकीय रुपे ठेवण्याच्या धोरणाने हे सुनिश्चित केले की प्रत्येक राज्याचे नमुने भौगोलिकदृष्ट्या उत्तम प्रतिनिधित्व करतात कारण, या ऐच्छिक नमुने घेण्याच्या 5 % धोरणामुळे काही जिल्ह्यांचे नमुन्यांमध्ये जास्त प्रतिनिधित्व केले गेले तर काही जिल्हे राज्यांमधून प्रतिनिधित्व करायचे राहिले. पॉझिटिव्हिटीमध्ये घट झाल्यामुळे, शून्य किंवा एक अंकी साप्ताहिक नवीन प्रकरणे असलेल्या जिल्ह्यांना पुरविणाऱ्या जनुकीय क्रमनिर्धारित नमुन्यांची उपलब्धता देखील कमी झाली आहे. सध्या देशातील 86 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक नवीन प्रकरणे आहेत.
गेल्या एक महिन्यापासून बहुतांश नवीन प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आढळली आहेत. आत्ता सध्या एकूण 45000 नवीन रुग्णांपैकी 32000 आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण केरळमधून आणि 4000 नवीन रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत, याचा अर्थ असा की, 80 % रुग्णसंख्या ही दोन राज्यांमधून आहे आणि केवळ 9000 रुग्णसंख्या, जी साधारण 20 % आहे, ती भारताच्या अन्य राज्यांमधून आहे. विविध राज्यांमधून आलेल्या जनुकीय अनुक्रमांमधूनही हे दिसून येते.
जुलै पासून पुढे, नमुना तपशीलांचे अचूक सामायिकरण आणि डब्ल्यूजीएस निकालांच्या वेळेवर संप्रेषणासाठी, डब्ल्यूजीएस साठी जनुकीय क्रमनिर्धारित नमुने आयएचआयपी पोर्टलद्वारे सामायिक केले जात आहे, जे नमुना तपशील आणि डब्ल्यूजीएस निकालांचे रिअल – टाइम सामायिकरण सुनिश्चित करते. त्यानुसार, जुलैमध्ये 9066 नमुने जनुकीय क्रमनिर्धारित साइटद्वारे पाठविण्यात आले आहे आणि ऑगस्टमध्ये 6969 नमुने सामायिक करण्यात आले आहेत.
NCDC मध्ये पँगो वंशासह (विविध INSACOG प्रयोगशाळांमधून) महिनानिहाय प्राप्त नमुने -
***
UU/SS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752518)
Visitor Counter : 276