पंतप्रधान कार्यालय

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांत बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल मनोज सरकारचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 04 SEP 2021 5:27PM by PIB Mumbai

 

टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल मनोज सरकारचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की "@manojsarkar07 च्या अप्रतिम खेळाने अपरिमित आनंद दिला. बॅडमिंटनसारख्या खेळातील प्रतिष्ठेचे कांस्यपदक मिळवल्याबद्दल त्याचे अभिनंदन. आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा.

#Paralympics #Praise4Para"

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1752141) Visitor Counter : 141