कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीतील BCCL या कंपनीकडून ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा' चा भाग म्हणून स्वच्छतेबद्दल जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
04 SEP 2021 4:38PM by PIB Mumbai
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या देशव्यापी सोहळ्याचा एक भाग म्हणून कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) या मिनीरत्न कंपनीने स्वच्छता आणि कोविड-19 संबंधित प्रतिबंधात्मक उपाय या संदर्भातील जनजागृतीसाठी नुकताच एक विशेष कार्यक्रम आयोजित केला.
या सुरु असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून BCCL कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व म्हणजेच CSR विभागाने झारखंड येथील धनबाद विभागातील पुटकीबलिहारी या भागातील मुख्यत्वे अनुसूचित जाती ,जमाती व इतर मागास वर्गीयांची वस्ती असणाऱ्या अल्गोरिया बस्ती या भागात
हॅन्ड सॅनिटायझर व मुख पट्ट्यांच्या 125 पाकीटांचे वाटप केले. दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या जगजीवन नगर येथील 'पहला कदम स्कूल' या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनाही BCCL कडून हॅन्ड सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजकांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याची सवय लावून घेणे तसेच मास्कचा वापर करण्याचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' ' या कल्पनेवर आधारित अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले.
***
R.Aghor/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752005)
Visitor Counter : 320