पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नाहियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा
Posted On:
03 SEP 2021 10:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झाएद अल नहियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-युएई व्यापक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यातल्या सातत्यपूर्ण प्रगतीचे सकारात्मक मूल्यांकन केले. कोविड -19 महामारी दरम्यान भारतीय समुदायाला संयुक्त अरब अमिरातीने केलेल्या मदतीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 1 ऑक्टोबर 2021 पासून दुबईत आयोजित एक्स्पो -2020 साठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी सामायिक चिंतेच्या प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा केली. जगात दहशतवाद आणि कट्टरतावादाला अजिबात स्थान नाही यावर त्यांनी सहमती दर्शवली आणि अशा शक्तींच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र उभे राहण्याच्या महत्वावर भर दिला.
***
RadhikaA/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751950)
Visitor Counter : 216
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam