गृह मंत्रालय
अफगाणिस्तानमधल्या सध्याच्या सुरक्षाविषयक परिस्थितीमुळे अफगाणिस्तानच्या नागरिकाना आता भारतात केवळ ई-व्हिसा वरच प्रवास करता येईल
प्रविष्टि तिथि:
25 AUG 2021 1:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2021
अफगाणिस्तानमधली सुरक्षाविषयक सध्याची परिस्थिती आणि ई इमर्जन्सी X-Misc व्हिसा आणून त्याद्वारे व्हिसा प्रक्रिया सुटसुटीत केल्यानंतर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी,आतापासून भारतात केवळ ई व्हिसा वरच प्रवास करावा असा निर्णय घेण्यात आला आहे.
अफगाणिस्तानच्या काही नागरिकांचे पारपत्र गहाळ झाल्याबाबतची काही वृत्ते लक्षात घेता, अफगाणिस्तानच्या नागरिकांना, जे सध्या भारतात नाहीत,त्यांना याआधी जारी करण्यात आलेले व्हिसा ताबडतोब अवैध ठरत आहेत. भारतात प्रवास करू इच्छिणारे अफगाणी नागरिक www.indianvisaonline.gov.in इथे ई व्हिसा साठी अर्ज करू शकतात.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1748823)
आगंतुक पटल : 355
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam