आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोविड-19 लसीकरणाने एकूण 58.89 कोटींचा टप्पा ओलांडला


रोगमुक्तीचा दर (97.68%); मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर

गेल्या 24 तासांत 25,467 नवीन रुग्ण आढळले

सक्रीय रूग्ण एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षाही कमी; मार्च 2020 पासूनची ही सर्वात कमी संख्या

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,19,551 असून गेल्या 156 दिवसांतील सर्वात कमी संख्या असून सक्रिय रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 0.98%,

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.55%), गेले 29 दिवस 3% पेक्षा कमी

Posted On: 24 AUG 2021 10:07AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने आता 58.89 कोटींचा (58,89,97,805) टप्पा पार केला आहे. यासाठी 65,03,493 सत्रे आयोजित करण्यात आली होती.


आज सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

 

HCWs

1st Dose

1,03,53,692

2nd Dose

82,32,742

FLWs

1st Dose

1,83,07,076

2nd Dose

1,26,40,318

Age Group 18-44 years

1st Dose

22,03,32,468

2nd Dose

2,03,29,375

Age Group 45-59 years

1st Dose

12,34,70,622

2nd Dose

4,93,70,668

Over 60 years

1st Dose

8,36,87,351

2nd Dose

1,03,53,692

Total

58,89,97,805


संपूर्ण देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा आवाका आणि गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.


गेल्या 24 तासांत 39,486 रुग्ण रोगमुक्त झाले असून, या महामारीची सुरुवात झाल्यापासून रोगमुक्त झालेल्यांची संख्या आता 3,17,20,112 झाली आहे.


परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर मार्च 2020 पासून सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजेच 97.68% वर आला आहे.



केंद्र सरकार तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त आणि अथक प्रयत्नांमुळे नवे रुग्ण आढळण्याचा दैनंदिन कल गेले सलग 58 दिवसांमध्ये 50,000 पेक्षा खालीच राहिला आहे.


गेल्या 24 तासांत 25,467 नवीन रुग्ण आढळले.


कोविडमुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढत जाणारी संख्या आणि नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांची कमी होणारी संख्या यामुळे गेल्या 156 दिवसांत भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,19,551 वर आली आहे. ही संख्या एकूण रूग्णसंख्येच्या 0.98% इतका असल्याने सक्रीय रूग्णभार एकूण रुग्णसंख्येच्या 1% इतका आहे. सक्रीय रुग्णांची ही संख्या मार्च 2020 पासून सर्वात नीचांकी पातळीवर आली आहे.



देशभरातील कोविड चाचण्यांची क्षमता सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत 16,47,526 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत भारताने एकूण 50.93 कोटी चाचण्या (50,93,91,792) पूर्ण केल्या आहेत.

 

देशभरातील कोविड चाचण्यांची क्षमता सतत वाढत वाढवत असतानाच, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.90% पर्यंत आला आहे, आणि तो गेल्या 60 दिवसांपासून 3% पेक्षाही कमी आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 1.55% आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेल्या 29 दिवसांत 3% च्या खालीच राहिला असून गेल्या सलग 78 दिवसांत तो 5% च्या खाली राहिला आहे.

 


* * *

 


(रिलीज़ आईडी: 1748459)

S.Tupe/Sampada.P/C.Yadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1748503) Visitor Counter : 226