पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्य प्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान 7 ऑगस्टला संवाद साधणार
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2021 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PMGKAY) मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधतील.
या योजनेबद्दल लोकांना माहिती व्हावी आणि कोणीही पात्र व्यक्ती या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून मध्यप्रदेश सरकारतर्फे खास मोहिम सुरू आहे. मध्यप्रदेशात 7 ऑगस्ट 2021 हा दिवस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून मध्यप्रदेशातील 4.83 कोटी लाभार्थींना 25,000 स्वस्त धान्य दुकानातून विनामुल्य धान्य मिळत आहे.
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल व मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, हरयाणा व गोवा या राज्यांमधील अन्नधान्य क्षेत्राशी संबधित मंत्री तसेच अधिकारीसुद्धा भाग घेतील.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1742903)
आगंतुक पटल : 277
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam