पंतप्रधान कार्यालय

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 05 AUG 2021 9:46AM by PIB Mumbai

 

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, या विजयामुळे त्यांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये विशेषत: आपल्या तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"ऐतिहासिक ! हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत  कोरला जाईल.

कांस्य पदक जिंकल्याबद्दल आपल्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये  विशेषत: आपल्या तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे."

 

***

STupe/SKane/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1742605) Visitor Counter : 269