पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या 5 ऑगस्टला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2021 9:27AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 04 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 ऑगस्ट 2021 ला दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
उत्तर प्रदेशात 5 ऑगस्ट हा दिवस पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये या उद्देशाने संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात उद्यापासून मोठा जनजागृती कार्यक्रम देखील सुरु करण्यात येईल.
राज्यातील जवळजवळ 15 कोटी लाभार्थ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून मोफत अन्नधान्य दिले जात आहे. सुमारे 80,000 स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्यात धान्य वितरीत होत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
****
STupe/SChitnis/Cyadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1742162)
आगंतुक पटल : 292
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada