पंतप्रधान कार्यालय
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा
Posted On:
29 JUL 2021 10:32AM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वन्यजीव प्रेमींना विशेषतः जे व्याघ्र संवर्धनासाठी झपाटून काम करत असतात अशा सर्व वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.
"आज #InternationalTigerDay, निमित्त सर्व वन्यजीव प्रेमींना-विशेषतः जे व्याघ्र संवर्धनासाठी झपाटून काम करत असतात अशा सर्व वन्यप्रेमींना शुभेच्छा ! जगातल्या 70% वाघांचे निवासस्थान असलेल्या या भूमीत त्यांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी आणि व्याघ्र-स्नेही पारिसंस्थेचे जतन करण्याची आमची कटीबद्धता आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो आहोत.
भारत 18 राज्यांत पसरलेल्या 51 व्याघ्र राखीव क्षेत्रांची भूमी आहे. 2018 साली झालेल्या व्याघ्र गणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले आहे. भारताने व्याघ्र संवर्धनाबाबत सेंट पिट्सबर्ग घोषणापत्रानुसार, निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट चार वर्षे आधीच पूर्ण केले आहे.
भारताच्या व्याघ्र संवर्धन धोरणात स्थानिक समुदायांना या कार्यात सहभागी करुन घेण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. निसर्गासोबत सौहार्दपूर्ण सहअस्तित्व ठेवण्याच्या आमच्या प्राचीन परंपरा आणि मूल्यांपासूनही आम्ही प्रेरणा घेतली आहे.", असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.
******
Sonal Tupe/Radhika Aghor/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1740190)
Visitor Counter : 318
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam