पंतप्रधान कार्यालय

बाराबंकी इथल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सहाय्य जाहीर

प्रविष्टि तिथि: 28 JUL 2021 9:40AM by PIB Mumbai

उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या रस्ते अपघातातल्या  जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या रस्ते अपघाताच्या वृत्ताने दुःख झाले असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्यासमवेत बोलणे झाले असून जखमींवर उपचाराची व्यवस्था केली जात आहे.



पंतप्रधानांनी, अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधानांनी बाराबंकी इथल्या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचे सहाय्य जाहीर केल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

***
 

STupe/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1739759) आगंतुक पटल : 223
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam