आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोविड-19 लसीकरणाने  आतापर्यंत एकूण 42 कोटीपेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण करत गाठला महत्वपूर्ण टप्पा


कोरोनामुक्तीचा दर वाढून 97.36% पर्यंत पोहोचला

गेल्या 24 तासांत 35,342 नवीन दैनंदिन रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या (4,05,513) सध्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.30% इतकी

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.12%), सलग 32 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

Posted On: 23 JUL 2021 11:18PM by PIB Mumbai

 

भारतात आतापर्यंत एकूण 42 कोटीपेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण करत कोविड-19 लसीकरण मोहिमेने काल  महत्वपूर्ण टप्पा गाठला असून ,आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार, कोरोना प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत 51,94,364 सत्रांद्वारे एकूण 42,34,17,030 मात्रा, देण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत लसींच्या 54,76,423 मात्रा देण्यात आल्या.

 

याचे तपशील पुढीलप्रमाणे-

HCWs

1st Dose

1,02,80,416

2nd Dose

76,51,103

FLWs

1st Dose

1,78,34,482

2nd Dose

1,06,40,254

Age Group 18-44 years

1st Dose

13,33,04,056

2nd Dose

55,55,468

Age Group 45-59 years

1st Dose

9,95,79,752

2nd Dose

3,25,92,396

Over 60 years

1st Dose

7,29,46,445

2nd Dose

3,30,32,658

Total

42,34,17,030

 

दि. 21 जून 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभर लसीकरणाचा वेग व व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

या महामारीच्या आरंभापासून विचार करता, बाधित रुग्णांपैकी 3,04,68,079 व्यक्ती आतापर्यंत कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या चोवीस तासांत 38,740 रुग्ण कोविड-19 रोगापासून मुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत असून आता तो 97.36% पर्यंत पोहोचला आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 35,342 नवीन कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या सलग सव्वीस (26) दिवसांपासून, दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 50,000 पेक्षा कमी आहे. केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी समन्वयाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच हे फलित आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या आज 4,05,513 इतकी असून, सध्या तिचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 1.30% इतके आहे.

कोविड चाचण्या करण्याच्या क्षमतेत देशभरात लक्षणीय वाढ झाल्याने गेल्या चोवीस तासांत देशात एकूण 16,68,561 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण 45.29 कोटीपेक्षा अधिक (45,29,39,545) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

एकीकडे देशातील चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात यश आले असून त्याचवेळी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.14% इतका आहे, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  2.12% इतका आहे. गेल्या सलग 32 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3% पेक्षा कमी आहे, तर तो 5% पेक्षा कमी असण्याचा हा सलग 46 वा दिवस आहे.

***

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738398) Visitor Counter : 188