आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 40 कोटी लसींच्या मात्रा देण्याचा लक्षणीय टप्पा गाठला आहे.
रोगमुक्तीचा दर 97.31% पर्यंत वाढला
गेल्या 24 तासांत 41,157 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
भारतातील सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या (4,22,660) असून आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या ती 1.36% आहे.
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (2.13 %) सलग 27 व्या दिवशी 3% हून कमी
Posted On:
18 JUL 2021 10:25AM by PIB Mumbai
भारतातील भारतातील लसीकरण मोहिमेमध्ये दिल्या गेलेल्या लसींच्या एकूण मात्रांची संख्या आता 40 कोटींच्या लक्षणीय पातळीजवळ पोहोचली आहे. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 50,46,387 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 40,49,31,715 मात्रा देण्यात आल्या. आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 51,01,567 मात्रा देण्यात आल्या आहेत.
त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे सार्वत्रिकीकरण करण्याचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. केंद्र सरकार, देशभरात लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे.
महामारीच्या सुरुवातीपासून कोविड बाधित झालेल्यांपैकी 3,02,69,796 व्यक्ती यापूर्वीच कोविडमधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 42,004 कोरोना जण रोगमुक्त झाले. यामुळे एकंदर रोगमुक्ती दर 97.31% झाला असून यावरून रोगमुक्ती दराचा सतत वाढता कल दिसून येतो आहे.
भारतात, गेल्या 24 तासांत, 41,157 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
गेले सलग 21 दिवस, रोज नोंद होणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,22,660 आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण भारतातील एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या फक्त 1.36% इतके आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांचा वेग लक्षणीय प्रमाणात वाढविण्यात आला असून गेल्या 24 तासांच्या कालावधीत देशात एकूण 19,36,709 चाचण्या करण्यात आल्या. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 44 कोटी 39 लाखांहून जास्त (44,39,58,663) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
एकीकडे देशभरात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येत असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात देखील सातत्याने घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.08 % आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.13% इतका आहे. गेले सलग 27 दिवस हा दर 3% हून कमी तर गेले सलग 41 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.
***
MC/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736538)
Visitor Counter : 225