ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
डाळींच्या साठा मर्यादेबाबत काही प्रसारमाध्यमांवर/ समाज माध्यमांवर पसरलेली चुकीची माहिती आणि त्याबाबतचे स्पष्टीकरण
Posted On:
15 JUL 2021 2:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2021
देशांतर्गत डाळींचा साठा करण्याबाबतच्या मर्यादा दूर करण्यात आल्याचा संदेश व्हॉट्सअपवरून पाठविला जात आहे. या संदर्भात असे स्पष्ट करण्यात आले आहे का, दिनांक 2.7.21 च्या आदेशानुसार शिल्लक डाळींवर साठवणुकीची असलेली मर्यादा हटविण्यात आलेली नसून ती मर्यादा कायम आहे. राज्यांकडून होणाऱ्या या आदेशांच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर स्टॉकिस्टद्वारे जाहीर करण्यात आलेला साठा तसेच बँकेकडून घेतले गेलेले कर्ज किंवा आयातदारांकडून आयात केलेले प्रमाण यात अनेकदा तफावत आढळत असल्याचे केंद्र सरकारने राज्यांना कळवले आहे. स्टॉक मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे.
Jaydevi PS/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1735831)
Visitor Counter : 253