मंत्रिमंडळ
महागाई भत्ता आणि महागाई दिलासा निधीत वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
Posted On:
14 JUL 2021 5:46PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई दिलासा निधीत, एक जुलै 2021 पासून 28 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सध्या असलेल्या मूळ वेतन/पेन्शनच्या 17 टक्के इतका महागाई भत्ता/दिलासा कर्मचाऱ्यांना मिळत होता, त्यात या निर्णयाने 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कोविड-19 मुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन, महागाई भत्त्याचे तसेच महागाई दिलाशाचे तीन हप्ते, जे 01जानेवारी 2020, 01 जुलै 2020 आणि 01 जानेवरी 21 ला देय होते, ते देण्यात आले नव्हते.
आता सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई हप्ता आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई दिलासा, 01.07.2021 पासून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 28 टक्क्यांपर्यंत केली जाणार आहे. ही वाढ, आधीच्या तीन देय वाढीशी सुसंगत आहे. मात्र, 01.01.2020 ते 30.06.2021 या कालावधीतील महागाई हप्ता/दिलासा 17 टक्के एवढाच कायम राहणार आहे.
***
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1735466)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam