पंतप्रधान कार्यालय

टोकियो -2020 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाच्या सुविधांच्या तयारीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा


पंतप्रधान 13 जुलै रोजी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी साधणार संवाद

Posted On: 09 JUL 2021 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2021

टोकियो -2020 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाच्या सुविधांच्या तयारीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.

पंतप्रधान 13 जुलै रोजी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी संवाद साधणार आहेत.

ट्वीट संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणाले, टोकियो 2020 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाच्या सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. लॉजिस्टिकल तपशील, त्यांची लसीकरण स्थिती, खेळाडूंना आवश्यक विविध शाखीय  समर्थन यावर चर्चा केली.

130 कोटी भारतीयांच्या वतीने मी 13 जुलै रोजी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी संवाद साधणार आहे. चला आपण सर्वानी #Cheer4India. भारतीय खेळाडूंचा हुरूप वाढवूया.

 

Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734247) Visitor Counter : 179