PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 07 JUL 2021 8:35PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 36.13 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India reports 43,733 new cases in last 24 hours
  • India's Active Caseload declines to 4,59,920
  • Active cases constitute 1.5% of total cases
  • 2,97,99,534 Total Recoveries across the country so far
  • 47,240 patients recovered during last 24 hours
  • Daily recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 55th consecutive day
  • Recovery Rate increases to 97.18%
  • Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.39%
  • Daily positivity rate at 2.29%, less than 3% for 16 consecutive days

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 7 जुलै 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

लसीकरण मोहिमेच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ओलांडून, देशात लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 36 कोटींचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 47,07,778 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 36,13,23,548 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 36,05,998 मात्रा देण्यात आल्या.

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु करण्यात आला. देशभरातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन  मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

भारतात, गेल्या 24 तासांत, 43,733 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. गेल्या दहा दिवसांपासून रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या देखील सतत कमी होताना दिसत आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,59,920. इतकी आहे. गेल्या 24 तासांत, एकूण सक्रीय रुग्णसंख्या 4,437 ने कमी झाली आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या फक्त 1.50% इतके आहे.

देशात कोविड-19 संसर्गातून अधिकाधिक रुग्ण बरे होत असल्यामुळे, आता देशातील एका दिवसात कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 55 व्या दिवशी रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या  बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसते. गेल्या 24 तासांत 47,240  रुग्ण कोरोनामधून मुक्त झाल्याची नोंद झाली. एका दिवसात नव्याने बाधित होणाऱ्यांच्या संख्येशी तुलना करता, गेल्या 24 तासांत, 3 हजाराहून अधिक (3,507) व्यक्ती रोगमुक्त झाल्या. महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 2,97,99,534 व्यक्ती यापूर्वीच कोविडमधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 47,240 व्यक्ती रोगमुक्त झाल्या. यामुळे एकंदर रोगमुक्ती दर 97.18% झाला असून यावरून रोगमुक्ती दराचा सतत वाढता कल दिसून येतो.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 19,07,216 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 42 कोटी 33 लाखांहून जास्त (42,33,32,097) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात देखील सातत्याने घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.39% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.29% इतका आहे. आता, सलग 16 व्या दिवशी हा दर 3% हून अधिक आहे आणि गेला महिनाभर हा दर 5% हून कमी असल्याची नोंद झाली आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महाराष्‍ट्र अपडेट :

महाराष्ट्रात मंगळवारी 8,418 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आणि 171 मृत्यूंची नोंद झाली तर दिवसभारत 10,548 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. महाराष्ट्रात 61,13,335 संक्रमित रुग्ण असून  मृतांचा आकडा 1,23,531 आहे. आत्तापर्यंत 1,14,297 सक्रिय प्रकरणांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58,72,268 आहे.

 

गोवा अपडेट :

गोव्यातील कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या 257 ने वाढून मंगळवारी 1,67,823 झाली आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या 230 ने वाढली आहे. राज्यात आत्तापर्यंत 3,079 जणांचा मृत्यू झाला असून 1,62,787 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर 1,957 सक्रिय रुग्ण आहेत. गोव्याने कोविड -19 लसीच्या 10 लाख मात्रा देऊन मैलाचा दगड गाठला आहे. 6 जुलैपर्यंत राज्यात लसीच्या एकूण 10,06,824 मात्रा देण्यात आल्या.

Important Tweets

 

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733475) Visitor Counter : 229


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi