आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती
37.43 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रांचा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा
1.67 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांमध्ये अद्याप उपलब्ध
Posted On:
07 JUL 2021 10:46AM by PIB Mumbai
देशभरात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि मोहिमेला गती देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे, जेणेकरून ते लसीकरणाचे नियोजन अधिक उत्तमरितीने करू शकतील आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा उपलब्ध करून देत, केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. कोविड -19 प्रतिबंध लसीच्या सार्वत्रिकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करेल आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा मोफत पुरवठा केला जाईल.
आतापर्यंत केंद्रसरकारने 37.43 कोटींपेक्षा अधिक (37,43,25,560) लसीच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना यापूर्वीच उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व माध्यमांमधून 48,65,110 लसीच्या मात्रा पाठवण्याच्या प्रक्रियेत आहे.
आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, यापैकी वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 35,75,98,947 लसीच्या मात्रांचा वापर करण्यात आला आहे.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.67 कोटींपेक्षा अधिक (1,67,26,613) लसींच्या मात्रांचा साठा उपलब्ध आहे.
***
ST/SS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733313)
Visitor Counter : 327