शिक्षण मंत्रालय
एजुकेशन प्लस साठीच्या एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणा अहवाल (UDISE+) 2019-20 चे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
सर्व स्तरातील शालेय शिक्षणात सकल हजेरीपट नोंदणी गुणोत्तर, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर आणि मुलींच्या हजेरीपट नोंदणीत सुधारणा झाल्याचा अहवालात निष्कर्ष
Posted On:
01 JUL 2021 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2021
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखारीयाल ‘निशंक यांनी आज भारतातील शालेय शिक्षणाविषयक एजुकेशन प्लस साठीच्या एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणा अहवाल (UDISE+) 2019-20 चे प्रकाशन केले.
UDISE+ 2019-20 च्या या अहवालानुसार, वर्ष 2018-19 च्या तुलनेत वर्ष 2019-20 मध्ये सर्व स्तरातील शालेय शिक्षणात सकल हजेरीपट नोंदणी गुणोत्तरात सुधारणा झाली आहे. तसेच सर्व शालेय शिक्षणात विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तरातही सुधारणा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या अहवालानुसार, वर्ष 2019-20 मध्ये, प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणपातळीत विद्यार्थिनीची नोंदणी 12.08 कोटी इतकी आहे. 2018-19 च्या तुलनेत यात 14.08 लाख विद्यार्थीनींची वाढ झाली आहे. वर्ष 2012-13 ते 2019-20 या काळात, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन्ही पातळ्यांवर, लिंगभाव समानता निर्देशांकात (GPI) सुधारणा झाली आहे.
UDISE+ 2019-20 अहवालात, शाळांमध्ये वीज जोडणी, कार्यरत संगणक, इंटरनेट सुविधा या सगळ्यासह असलेल्या शाळांची संख्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे.
त्यासोबतच, अनेक शाळांमध्ये हात स्वच्छ धुण्यासाठीची व्यवस्था केली असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्ष 2019-20 मध्ये,भारतातील 90% शाळांमध्ये हात धुण्यासाठी हँड वॉशची सुविधा आहे, वर्ष 2012-13 मध्ये ही सुविधा केवळ 36.3% शाळांमध्ये उपलब्ध होती.
UDISE+ ही शाळांकडून ऑनलाईन माहिती/आकडेवारी संकलित करणारी एक व्यवस्था असून, वर्ष 2018-19 मध्ये ती विकसित करण्यात आली आहे. याआधी कागदावर ही माहिती संकलित केली जाऊन, ती तालुका अथवा जिल्हा पातळीवर पाठवली जात असे, 2012-13 पासून ही पद्धत अस्तित्वात होती. मात्र, त्यातील त्रुटी आणि समस्या लक्षात घेऊन आता, ऑनलाईन पद्धत विकसित करण्यात आली आहे. UDISE+ डेटा साठी संदर्भ वर्ष म्हणून 2019-20 ग्राह्य धरले जात आहे.
एजुकेशन प्लस साठीच्या एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणा अहवाल (UDISE+) 2019-20 ची ठळक वैशिष्ट्ये:
वर्ष 2019-20 मध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळेल्या शिक्षणातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 26.45 कोटी पेक्षा अधिक होती. वर्ष 2018-19 च्या तुलनेत, त्यात 42.3 लाख विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
सर्व स्तरातील शालेय शिक्षणात, वर्ष 2018-19 च्या तुलनेत वर्ष 2019-20 सकल हजेरीपट नोंदणी गुणोत्तरातही सुधारणा झाली आहे.
वर्ष 2018-19 च्या तुलनेत, वर्ष 2019-20 मध्ये, उच्च प्राथमिक स्तरावर सकल हजेरीपट नोंदणी गुणोत्तर 89.7% इतके वाढले आहे.(आधी ते 87.7% इतके होते), प्राथमिक स्तरावर , 97.8% (आधी ते 96.1%) इतके होते), माध्यमिक स्तरावर 77.9% (76.9% वरून) तर उच्च माध्यमिक स्तरावर 51.4%( 50.1% वरून) इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे.
वर्ष 2012-13 ते 2019-20 या कालावधीत, सकल हजेरीपट नोंदणी गुणोत्तर (प्रमाणात) सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
याच कालावधीत, उच्च माध्यमिक शिक्षणात, सकल सकल हजेरीपट नोंदणी गुणोत्तरात सुमारे 11 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे.
वर्ष 2019-20, मध्ये 96.87 लाख शिक्षक शालेय शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. आधीच्या, 2018-19 वर्षाच्या तुलनेत, यात संख्येत 2.57 लाखांची वाढ झाली आहे.
दिव्यांग मुलांसाठी सार्वत्रिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने, सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे, वर्ष 2018-19 च्या तुलनेत, दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या, 6.52% नी वाढली आहे.
वर्ष 2019-20 मध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणात, मुलींची हजेरीपटावरील नोंदणी, 12.08 कोटी इतकी आहे. वर्ष 2018-19 च्या तुलनेत, या संख्येत, 14.08 लाख विद्यार्थीनीची लक्षणीय भर पडली आहे.
उच्च प्राथमिक पातळीवर मुलींचे, गेल्यावर्षीच्या तुलनेत, सकल हजेरीपट नोंदणी प्रमाण 90.5% पर्यंत वाढले आहे. (88.5% वरून) तर प्राथमिक पातळीवर ते 98.7% (96.7% वरून), माध्यमिक पातळीवर 77.8% (76.9% वरून), आणि उच्च माध्यमिक पातळीवर 52.4% (50.8% वरून)पर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
वर्ष 2012-13 ते 2019-20 मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावर, मुलींचे हजेरीपटावरील प्रमाण, मुलांपेक्षाही अधिक झाले आहे.
वर्ष 2012-13 ते 2019-20 या कालावधीत, लिंगभाव समानतेचे प्रमाण, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक अशा दोन्ही पातळ्यांवर, सुधारले आहे. विशेषतः उच्च माध्यमिक पातळीवर, या निर्देशांकात लक्षणीय सुधारणा होऊन, 2012-13 मध्ये 0.97 असलेला निर्देशांक 2019-20 मध्ये 1.04 पर्यंत पोचला आहे.
भारतातील 80% पेक्षा अधिक शाळांमध्ये नियमित वीजपुरवठा होत आहे. वर्ष 2018-19 च्या तुलनेत यात 6% टक्यांची सुधारणा झाली आहे.
तसेच वर्ष 2018-19च्या तुलनेत, वर्ष 2019-20 मध्ये संगणक सुविधा असलेल्या शाळांच्या संख्येत, 4.7 लाखांवरुन 5.2 लाखांपर्यंत वाढ झाली आहे.
इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांची संख्या गेल्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत, 2.9 लाखांवरुन 3.36 लाखांपर्यंत वाढली आहे.
वर्ष 2019-20 मध्ये, 82% पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाली. आधीच्या 2018-19 वर्षाच्या तुलनेत, यात 4% ची वाढ झाली आहे.
भारतातील, 84% टक्क्यांपेक्षा अधिक शाळांमध्ये, 2019-20 मध्ये वाचनालय/अध्ययन कक्ष/वाचन कक्ष अशा सुविधा आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत, यातही 4% ची वाढ झाली आहे.
अहवालाच्या सविस्तर माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.education.gov.in/hi/statistics-new?shs%20term%20node%20tid%20depth%20=394&Apply=Apply
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731916)
Visitor Counter : 394