मंत्रिमंडळ

आरोग्य संशोधनाच्या क्षेत्रातील भारत आणि म्यानमारमधील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 30 JUN 2021 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जून 2021

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला ,भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि म्यानमारच्या आरोग्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वैद्यकीय संशोधन विभाग (डीएमआर), यांच्यातील फेब्रुवारी , 2020 मध्ये नवी दिल्लीत स्वाक्षरी झालेल्या  सामंजस्य कराराबद्दल  (एमओयू)  माहिती देण्यात आली.

परस्पर संशोधनाच्या विषयांमध्ये आरोग्य संशोधन संबंध वाढविणे हे या सामंजस्य कराराचे उद्दीष्ट आहे.मुख्य उद्दीष्टे अशी आहेतः

  1. संसर्गजन्य रोगांचे उच्चाटन (परस्पर सामंजस्याने निर्णय घेण्यात येईल )
  2. नवीन,  विषाणूजण्य  संसर्ग  नेटवर्क मंचाचा  विकास
  3. संशोधन पद्धती व्यवस्थापन, क्लिनिकल चाचण्या, नीतिशास्त्र इ. मधील प्रशिक्षण / क्षमता वाढवणे.
  4. नियामक यंत्रणेचे सामंजस्य

कार्यशाळा / बैठका आणि संशोधन प्रकल्पांसाठी निधीची वचनबद्धता त्या वेळी उपलब्ध असलेल्या निधीनुसार वेळोवेळी निश्चित केली जाईल.उभय पक्ष प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला  एक संयुक्त कार्य गट (जेडब्ल्यूजी) स्थापन करतील. संयुक्त कार्यगटाची सत्रे एकदा भारतात  तर एकदा म्यानमारमध्ये अशा पद्धतीने  घेतली जातील. व्हिसा प्रवेश , निवास, दैनिक भत्ता, आरोग्य विमा, संयुक्त कार्यगटाच्या सदस्यांची स्थानिक वाहतूक यासह प्रवासाशी संबंधित खर्च पाठवणाऱ्या पक्षाला उचलावा लागेल तर संयुक्त कार्य गटाच्या  बैठकींचा  संस्थात्मक खर्च आयोजक पक्ष उचलेल.

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1731615) Visitor Counter : 254