सांस्कृतिक मंत्रालय
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कलाकृती संदर्भात सांस्कृतिक मंत्रालयाचे स्पष्टीकरण
Posted On:
27 JUN 2021 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2021
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गहाळ झालेल्या कलाकृतींविषयी माध्यमांतून प्रसिद्ध होणारे वृत्त पूर्णपणे असत्य असल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त यावर्षी दिनांक 23 जानेवारी रोजी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे एका प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले होते, जिथे या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.
या कलाकृती रेड फोर्ट संग्रहालयाकडून पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत दोन संस्थांमधे औपचारिक सामंजस्य करार करून व्हिक्टोरिया मेमोरियल येथे सुयोग्य प्रक्रिया केल्यानंतर आणण्यात आल्या होत्या. हा करार 6 महिन्यांसाठी वैध असून तो पुढे एक वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. सदर कलाकृती कोलकात्याला पूर्ण सुरक्षा आणि विम्यासह पाठवण्यात आल्या होत्या. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, पुरातन वास्तू आणि प्रदर्शनीय कलाकृतींची देवाणघेवाण हा संग्रहालयांमधला नियमित प्रकार आहे. या प्रकरणामध्ये, पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ASI) आणि व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल (VMH) दोन्हीही सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाच्या अखत्यारित येतात.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1730772)
Visitor Counter : 242