आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 31 कोटींचा टप्पा
गेल्या 24 तासात 61.19 लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या
गेल्या 24 तासात 48,698 नव्या रुग्णांची नोंद
भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 5,95,565 वर पोहचली. 86 दिवसांनंतर रुग्णसंख्या 6 लाखांखाली
सलग 44 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 96.72% वर
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.79%, सलग 19 व्या दिवशी तो 5% पेक्षा कमी
Posted On:
26 JUN 2021 10:46AM by PIB Mumbai
भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 31 कोटींचा मैलाचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 42,00,839 सत्रांमध्ये, एकूण 31,50,45,926 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 61,19,169 मात्रा देण्यात आल्या.
यात समावेश आहे:
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
भारतात गेल्या 24 तासात 48,698 नव्या रुग्णांची नोंद झाली.
सलग 19 दिवस 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.
भारतात सक्रीय रुग्णसंख्येतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 5,95,565 इतकी आहे. 86 दिवसांनंतर रुग्णसंख्या 6 लाखांखाली गेली आहे.
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 17,303 इतकी घट झाली असून सध्या देशात एकूण रुग्णसंख्येच्या केवळ 1.97% सक्रीय रुग्ण आहेत.
कोविड -19 संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत असल्याने सलग 44 दिवशी भारतात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 64,818 रुग्ण बरे झाले आहेत.
दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासात जवळपास, 16,000 (16,120) जण बरे झाले.
भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 2,91,93,085 तर गेल्या 24 तासात 64,818 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 96.72% झाला आहे.
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 17,35,781 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 39.78 कोटींपेक्षा अधिक (39,95,68,448) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 2.97% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी 2.79% आहे. सलग 19 व्या दिवशी हा 5% पेक्षा कमी आहे.
***
STupe/VGhode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1730493)
Visitor Counter : 202