आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 30 कोटी व्यक्तींचे लसीकरण करून पार केला महत्त्वाचा टप्पा


गेल्या 24 तासांत लसीच्या 64 लाख 89 हजार मात्रा देण्यात आल्या.

देशात गेल्या 24 तासांत 54,069 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन आता 6,27,057 रुग्ण कोविड बाधित

एका दिवसात कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 42 व्या दिवशी दैनंदिन नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त

रोगमुक्तीचा दर वाढून 96.61% झाला

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.91% इतका असून सलग 17 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी

Posted On: 24 JUN 2021 11:06AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 24 जून 2021

लसीकरण मोहिमेच्या प्रवासातील मैलाचा दगड पार करत, भारतात एकूण लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या संख्येने काल 30 कोटींचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 40,45,516 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 30,16,26,028 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 64,89,599 मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

HCWs

1st Dose

1,01,58,915

2nd Dose

71,32,888

FLWs

1st Dose

1,73,03,658

2nd Dose

91,85,106

Age Group 18-44 years

1st Dose

7,06,62,665

2nd Dose

15,02,078

Age Group 45-59 years

1st Dose

8,39,38,683

2nd Dose

1,33,51,488

Over 60 years

1st Dose

6,61,61,004

2nd Dose

2,22,29,543

Total

30,16,26,028

 

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे सार्वत्रिकीकरण करण्याचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. केंद्र सरकार, देशभरातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढवून व्याप्तीचा विस्तार करीत आहे.

भारतात, गेल्या 24 तासांत, 54,069 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेले सलग 17 दिवस, नव्या कोविड बाधितांची संख्या रोज 1 लाखांहून कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 

भारतातील सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत देखील सतत घसरण होताना दिसत आहे. भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 6,27,057 आहे.

गेल्या 24 तासांत, एकूण सक्रीय रुग्णसंख्या 16,137 ने कमी झाली आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण भारतातील एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या फक्त 2.08% इतके आहे.

 

कोविड-19 संसर्गातून अधिकाधिक रुग्ण बरे होत असल्यामुळे, भारतात आता एका दिवसात कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 42 व्या दिवशी दैनंदिन नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसते. गेल्या 24 तासांत 68,885 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले.

एका दिवसात बाधित होणाऱ्यांच्या संख्येशी तुलना करता, गेल्या 24 तासांत नवबाधितांपेक्षा 14 हजाराहून जास्त (14,816) व्यक्ती रोगमुक्त झाल्या आहेत.

 

महामारीच्या सुरुवातीपासून कोविड बाधित झालेल्यांपैकी 2,90,63,740 व्यक्ती यापूर्वीच कोविडमधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 68,885 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले. यामुळे एकंदर रोगमुक्ती दर 96.61% झाला असून यावरून त्याचा सतत वाढता कल दिसून येतो.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला असून गेल्या 24 तासांच्या कालावधीत देशात एकूण 18,59,469  चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 39 कोटी 78 लाखांहून जास्त (39,78,32,667) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

एकीकडे देशभरात चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात देखील सातत्याने घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.04% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.91% इतका आहे. सलग 17 व्या दिवशी हा दर 5% हून  कमी राहिला आहे.

 

***

UU/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1729972) Visitor Counter : 298