सांस्कृतिक मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने "योग एक भारतीय वारसा" संकल्पने अंतर्गत, भारतभरातील 75 ऐतिहासिक वारसा स्थळांवर योग कार्यक्रमांचे आयोजन
आरोग्यदायी आणि आंनदी भविष्यासाठी योग मार्ग अनुसरावा असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचे तरुणांना आवाहन
Posted On:
21 JUN 2021 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2021
दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ला इथे सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज मंत्रालयातील अधिकारी, योग तज्ञ आणि योगप्रेमींच्या साथीने योगाभ्यास केला. "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव" कार्यक्रमा अंतर्गत, "योग, एक भारतीय वारसा" या अभियानाचे ते नेतृत्व करत होते. स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी देशातील 75 ऐतिहासिक वारसा स्थळांवर हा योग कार्यक्रम आयोजित केला होता. यात मंत्रालया संबंधित सर्व संस्था आणि घटकांनी सक्रीय सहभाग घेतला. सध्याची महामारीची स्थिती लक्षात घेता प्रत्येक स्थळावर 20 जणांनाच सहभागी होण्याची मर्यादा घातली होती. योगाभ्यास करण्यापूर्वी, केंद्रीय मंत्र्यांसह सर्व सहभागी योगप्रेमींनी, आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण पाहिले.

लाल किल्ल्यावर योग दिन साजरा केल्यावर प्रल्हाद सिंग पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. योग हा आपला महान वारसा असल्याचे ते म्हणाले. हा आरोग्यदायी मंत्र जगभरात लोकप्रिय करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. याचीच फलनिष्पत्ती म्हणजे आज सारे जग आंतरराष्टीय योग दिवस साजरा करत आहे. लोकांनी, योग हा आपल्या जगण्याचा भाग बनवला आहे असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्त, अमृतमहोत्सवाअंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021 साजरा केला जात आहे असेही त्यांनी सांगितले. या अनुषंगाने, संस्कृती मंत्रालयाने, देशभरातील 75 ऐतिहासिक स्थळांवर योग कार्यक्रम आयोजित केले. आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी, योग हा आपल्या जीवनाचा भाग बनवावा असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

एमयोगा अॅप जगाला बहाल करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. या माध्यमातून यात शास्त्रशुद्ध योग प्रशिक्षणाच्या अनेक चित्रफिती विविध भाषांमधे उपलब्ध असल्याचे पटेल यांनी सांगितले. जगभरातील लोकांना आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी एमयोगा अॅप (mYoga app) नक्कीच लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लाल किल्ला इथला योगाभ्यास आचार्य प्रतिष्ठा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. संस्कृती सचिव, राघवेन्द्र सिंग, पर्यटन सचिव, अरविंद सिंग आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारीही या योग अभियानात सहभागी झाले.

वेरुळ लेणी (औरंगाबाद), नालंदा (बिहार), साबरमती आश्रम (गुजरात), हम्पी (कर्नाटक), लद्दाख शांती स्तूप (लेह), सांची स्तूप (विदिषा), शीश महल (पटियाला), राजीव लोचन मंदिर (छत्तीसगड), बोमदीला (अरुणाचल प्रदेश) यासह इतर ऐतिहासिक वारसा स्थळांवर संस्कृती मंत्रालयाने, योग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

शीश महल, पटियाला

वारंगळ किल्ला, वारंगळ.

वेरुळ लेणी, वेरुळ, औरंगाबाद

गंगाईकोंडा चोलापुरम

बोमदिला (अरुणाचल प्रदेश)

राजीव लोचन मंदीर, छत्तीसगड

हम्पी सर्कल
* * *
S.Tupe/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729065)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam