आयुष मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिन-2021 साजरा करण्यासाठी आतापर्यतच्या सर्वात भव्य टपाल उपक्रमामध्ये 800 टपाल कार्यालयात भारतीय टपाल खाते वापरणार विशेष कॅन्सलेशन शिक्का

Posted On: 19 JUN 2021 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2021

 

21 जून रोजी असणाऱ्या जागतिक योग दिना निमित्त भारतीय टपाल खात्याकडून टपाल तिकिटांवर उमटवण्यासाठी विशेष कॅन्सलेशन शिक्का जारी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन-2021 म्हणजे सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे  महत्व अधोरेखित करण्यासाठी हा शिक्का वापरला जाणार आहे.  या टपाल उपक्रमात विशेष चित्ररुपी शिक्क्याचा वापर भारतातील 810 मुख्य टपाल कार्यालयात करण्यात येईल. आत्तापर्यंतच्या टपाल संबंधित उपक्रमांपैकी हा सर्वात मोठा उपक्रम असेल.

टपाल पोचवणाऱ्या किंवा न पोचवणाऱ्या सर्व मुख्य टपाल कार्यालयात हा विशेष कॅन्सलेशन शिक्का 21 जून 2021 रोजी नोंदणी झालेल्या सर्व टपालांसाठी वापरण्यात येईल. हा विशेष चित्राच्या रुपात असलेला कॅन्सलेशन शिक्का म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 हे हिंदीत तसेच इंग्लिश भाषेत लिहिलेले आरेखन आहे.   टपाल पाठवताना त्यावर चिकटवलेले तिकिट पुन्हा वापरात येऊ नये यासाठी टपाल खात्याकडून कॅन्सलेशन शिक्का उमटवला जातो. संग्राहकांसाठी असे कॅन्सलेशन शिक्के महत्वपूर्ण असतात त्याच प्रमाणे टपाल संबंधित अभ्यास करणाऱ्यांनाही त्याचे महत्व असते.

गेल्या काही वर्षात टपाल तिकिटांचा संग्रह करण्याची वृत्ती कमी झाली आहे. हा छंद किंवा कला पुनर्जीवित व्हावी यासाठी भारतीय टपाल खाते टपाल ग्राहकांसाठी नवीन नवीन योजना राबवत असते. संग्राहकांसाठी टपाल संबंधित व ठराविकटपाल कार्यालयात टपाल तिकिटे उपलब्ध करून दिली जातात. कोणत्याही मुख्य टपाल कार्यालयात 200 रुपये जमा करून टपाल खाते कुणालाही उघडता येते व त्यात विशेष टपाल तिकिटे आणि कव्हर मिळवता येतात. याशिवाय टपाल विषयक ब्युरो आणि या खिडक्यांवर टपाल जमा अकाउंट योजने अंतर्गत  स्मरणार्थ काढलेली टपाल तिकिटे मिळवता येतात. ही तिकिटे कमी संख्येने छापली गेलेली असतात.

योगा आणि आंतरराष्ट्रीय योग दिन हे गेल्या काही वर्षात टपाल विषयक उपक्रमाचे आवडते विषय आहेत. 2015 मध्ये टपाल खात्याने आंतरराष्ट्रीय योग दिनी दोन टपाल तिकीटे तसेच लघु चित्रांचा संच प्रकाशित केला होता. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मरणार्थ सूर्य नमस्कारांच्या चित्रांवर आधारित टपाल तिकिटे प्रकाशित केली होती. 2017 या वर्षात संयुक्त राष्ट्र टपाल व्यवस्थापनाने एक टपाल संच जारी केला होता ज्यात न्यूयॉर्कमधील आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त दहा आसनांची चित्रे प्रदर्शित केली होती.

गेल्या सहा वर्षांपासून  आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात विविध पद्धतीने साजरा केला जात आहे. भारतातही योग दिन विविध पद्धतीने साजरा केला गेल्याची आठवण म्हणून चित्रे उपलब्ध आहेत यामध्ये भारतीय लष्करातील कर्मचारी हिमालयाच्या हिमाच्छादित रांगांमध्ये योग करताना,  सेवानिवृत्त झालेल्या  आय एन एस विराट वर नौदल अधिकारी आणि कॅडेट योगासने करताना, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश असलेली वाळूशिल्पे, आय एन एस सिंधू रस्ता या भारतीय नौदलाच्या पाणबुडीवर भारतीय नौदल अधिकारी योगा करताना ही चित्रे आहेत. आत्ताचा टपाल खात्याचा हा उपक्रम आंतरराष्ट्रीय योग दिनाची दखल घेणार्‍या आगळ्यावेगळ्या उपक्रमांपैकी एक आहे.

संयुक्त राष्ट्र आमसभेने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून स्वीकारल्याचे 11 सप्टेंबर 2014 रोजी  जाहीर केले. 2015 पासून जगभरात हा दिवस वाढत्या संख्येने साजरा होत आहे.

यावर्षी covid-19 महामारीची स्थिती लक्षात घेऊन अनेक उपक्रम दूरस्थ पद्धतीने साजरे केले जातील. यावर्षीची मुख्य कल्पनासुद्धा ‘योग करा घरी राहा’ हे आहे. भारत हळूहळू लॉकडाऊनच्या या परिस्थितीतून बाहेर येत आहे.  देशभरातील टपाल कार्यालयातून मिळून 800 पेक्षा जास्त  टपालसंग्राहकांना सामावून घेणारा हा भव्य टपाल उपक्रम देशात टपाल विषयक  संग्रह करण्याच्या सवयीला पुन्हा उजाळा देईल.

 

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728574) Visitor Counter : 240