युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

टोकियो ऑलिम्पिकसाठी कोणतेही मंत्रीस्तरीय प्रतिनिधीमंडळ पाठविले जाणार नाही


टोकियो येथील भारतीय दूतावासात  लॉजीस्टिक संदर्भातील मदतीसाठी ऑलिम्पिक अभियान कक्षाची उभारणी करण्यात येत आहे

Posted On: 11 JUN 2021 4:25PM by PIB Mumbai

 

भारतीय संघ आणि क्रीडापटू यांच्या टोकियो ऑलिम्पिक 2020 या स्पर्धांमधील सहभागाचा अहोरात्र आढावा घेतला जात आहे. या स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची कामगिरी सर्वोत्तम व्हावी यासाठी केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने जास्तीत जास्त प्रमाणात प्रशिक्षक, डॉक्टर्स तसेच फिजिओथेरपिस्ट यासारखा अतिरिक्त मदतनीस कर्मचारीवर्ग यांनाच  पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जर गरज असली तरच फक्त प्रशिक्षक, डॉक्टर्स आणि फिजिओथेरपिस्ट या मदतनीस कर्मचारीवर्गाखेरीज इतर व्यक्तीच्या भेटीला नियमावलीबरहुकुम परवानगी दिली जाईल . सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांसाठी कुठल्याही मंत्रालयाचे प्रतिनिधीमंडळ पाठविण्यात येणार नाही.  टोकियो येथील भारतीय दूतावासात ऑलिम्पिक अभियान कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. हा कक्ष, टोकियोला जाणाऱ्या भारतीय समूहाला मदत करण्यासाठी एक खिडकी तत्वावर सर्व प्रकारचे लॉजीस्टिक संदर्भातील पाठबळ पुरवेल, जेणेकरून शक्य असलेली सर्व मदत त्यांच्यापर्यंत सुरळीतपणे पोहोचेल.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1726249) Visitor Counter : 125