पंतप्रधान कार्यालय

प्रख्यात अर्थतज्ञ आणि पर्यावरणतज्ञ प्राध्यापक राधामोहन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 11 JUN 2021 11:00AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात अर्थतज्ञ आणि पर्यावरणतज्ञ प्रा. राधामोहन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.


"प्रा. राधामोहन जी शेतीविषयी विशेषतः शाश्वत आणि सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करण्यास उत्सुक होते. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण क्षेत्राशी संबंधित विषयांच्या त्यांच्या ज्ञानाबद्दलही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय  आणि प्रशंसक यांच्या प्रती मी सहानुभूती व्यक्त करतो, ओम शांती.", असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 


***

 

 

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1726179) आगंतुक पटल : 210
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada