आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरणाची ताजी माहिती


वैश्विक रोगप्रतिकार कार्यक्रम अंतर्गत येणाऱ्या लसींच्या सूची व्यवस्थापन आणि साठवणूकीच्या तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाद्वारे ई-विनचा उपयोग

या संवेदनशील ई-विन माहितीचा कोणत्याही अवैध व्यावसायिक कारणांसाठी गैरवापर रोखण्याकरिता केन्द्र सरकार वचनबद्ध.

कोविड-19 लसीकरण अभियान आणि संबंधित कोविनवर प्रसारित होणाऱ्या माहितीत पारदर्शकता राखण्यासाठीही केन्द्र सरकार कटिबद्ध

Posted On: 10 JUN 2021 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जून 2021

 

"संपूर्ण सरकार" दृष्टीकोनातून राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांद्वारे प्रभावी लसीकरणासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांना केन्द्र सरकार यावर्षी 16 जानेवारीपासून सहकार्य करत आहे.  देशभरात वेळेवर कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध व्हावी यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. साठवणूकीसह पुरवठा साखळीलाही सारखेच प्राधान्य दिले जात आहे. 

ई-विन सूची आणि तापमान माहितीबाबत केन्द्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख काही प्रसारमाध्यमांनी अधोरेखित केला आहे.

लसींचा साठा आणि त्या जिथे ठेवल्या आहेत तिथले तापमान याची संपूर्ण माहिती आणि मूल्यांकन ई-विन च्या माध्यमातून देण्याआधी केन्द्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी अवश्य घ्यावी असा सल्ला केंद्र सरकारने, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिला आहे. कुठल्याही संस्थेला या माहितीचा गैरवापर आपल्या व्यावसायिक लाभासाठी करता येऊ नये हा यामागचा उद्देश आहे. 

वैश्विक रोगप्रतिकार कार्यक्रम (यूनीवर्सल इम्यूनाइजेशन प्रोग्राम- यूआयपी) अंतर्गत अनेक लसींचा उपयोग केला जात आहे. त्या संबंधित तापमानाची माहितीही उपलब्ध आहे. विशिष्ट लसीच्या वापराबाबत अनेक महत्वपूर्ण सूचना दिलेल्या असतात. अन्य लसींचा विचार करता संबंधित विशिष्ट लसी संदर्भातील संशोधन, शितसाखळी उपकरणांची माहिती सोबतच बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ई-विन इलेक्ट्रॉनिक व्यासपीठाचा उपयोग करत आहे. यात यूआयपी अंतर्गत गेल्या सहा वर्षांपासून उपयोगात असलेल्या लसींचाही समावेश आहे. साठा, साठवणुकीची जागा आणि तापमाना संबंधित संवेदनशील माहिती  आरोग्य  मंत्रालयाच्या पूर्वपरवानगी शिवाय दिली जाऊ शकत नाही. 

कोविड-19 लसीचा साठा, त्याचा वापर, उरलेल्या लसीची माहिती कोविन व्यासपीठावर उपलब्ध असते. केंद्रीय आरोग्य मंत्रालय ही माहिती नियमितपणे आणि पारदर्शीपणे साप्ताहिक पत्रकार परिषद आणि दररोज प्रसिद्धि पत्रकातून प्रसारमाध्यमे आणि जनतेला देत असते. 

कोविड-19 लसीकरण अभियानात  पारदर्शकता आणण्याकरता केंद्र सरकार कटिबद्ध आहे. लसीचा  तंत्रज्ञानाधारित मागोवा घेण्यामागे केन्द्र सरकारचा हाच उद्देश आहे.  कोविनच्या माध्यमातून लस  लाभार्थ्यापर्यंत पोहचेस्तोवर पूर्ण लक्ष ठेवले जाते. जनतेला नियमितपणे संबंधित माहिती देता यावी हाच यामागचा उद्देश आहे. 

 

* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725975) Visitor Counter : 382