PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 05 JUN 2021 6:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 5 जून 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

 

  • India reports 1.20 Lakh Daily New Cases in last 24 hours, lowest in 58 days
  • Less than 2 Lakh since 9 successive days
  • On a sustained downward slope, India's Active Caseload further decreases to 15,55,248
  • Active Cases decrease by 80,745 in last 24 hours
  • More than 2.67 crore persons have recovered from COVID infection across the country so far
  • 1,97,894 patients have recovered during last 24 hours
  • More daily Recoveries than Daily New Cases reported for 23 consecutive days
  • Steady continuous increase in national Recovery Rate, stands at 93.38% today
  • Weekly Positivity Rate currently at 6.89%
  • Daily positivity rate further dips to 5.78%, less than 10% for 12 consecutive days
  • With substantially ramped up Testing capacity, more than 36.1 cr tests total conducted so far
  • 22.78 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

Image

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

भारतात गेल्या 24 तासांच्या कालावधीत दैनंदिन पातळीवरील सुमारे दोन महिन्यांतील (गेल्या 58 दिवसांत) सर्वात कमी म्हणजे 1,20,529 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली. यामुळे गेले सलग 9 दिवस देशातील दैनंदिन पातळीवर 2 लाखांहून कमी नव्या कोविड बाधितांची नोंद होत आहे. केंद्र सरकार आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतात सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत आता सतत घसरण दिसून येत आहे. देशातील सक्रीय कोविड बाधितांची संख्या आज 15,55,248 इतकी आहे. सलग पाचव्या दिवशी ही रुग्णसंख्या 20 लाखांपेक्षा कमी आहे.

गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 80,745 ने घट झाली आणि देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 5.42% इतकी आहे.

भारतात सलग 23 व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत 1,97,894 रुग्ण कोविडमधून मुक्त झाले.

गेल्या 24 तासांत दैनंदिन पातळीवर नव्याने संसर्ग होणाऱ्या रुग्णांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या 77,365 ने अधिक होती.

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोना आजार झालेल्यांपैकी 2,67,95,549 व्यक्ती कोविड -19 मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 1,97,894 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 93.38% झाला असून या दराचा चढता कल दिसून येत आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग निश्चित करण्यासाठी एकूण 20,84,421 चाचण्या झाल्या आहेत आणि भारताने आतापर्यंत एकूण 36.1 कोटीहून अधिक (36,11,74,142) चाचण्या केल्या आहेत.

देशात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविले असतानाच दुसरीकडे साप्ताहिक पातळीवर पॉझिटीव्हिटी दरातील घसरण सुरु असल्याचे दिसते आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 6.89% असून दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 5.78% इतका आहे. हा दर सलग 12 व्या दिवशी 10% हून कमी राहिला आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 22 कोटी 78 लाखांहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. गेल्या 24 तासांत लसीच्या 36,50,080 मात्रा देण्यात आल्या

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, देशात 32,00,677 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 22,78,60,317 मात्रा देण्यात आल्या आहेत.

 

इतर अपडेटस्

Important Tweets

 

***

Jaydevi PS/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1724813) Visitor Counter : 197


Read this release in: English , Hindi , Punjabi