आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात गेल्या 24 तासांत 1.34 लाख दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद


सलग सातव्या दिवशी दैनंदिन नवीन रूग्णसंख्या 2 लाखांहून कमी

सक्रीय रुग्णसंख्या 17,13,413; सलग तिसऱ्या दिवशी सक्रिय रूग्णसंख्या 20 लाखांपेक्षा कमी

सलग 21 व्या दिवशी दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत अधिक

बरे होण्याचा दर आणखी वाढून 92.79%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 6.21% इतका असून सलग दहा दिवस तो 10% पेक्षा कमी

राष्ट्रीय लसीकरण अभियानाअंतर्गत भारतात 22 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 03 JUN 2021 2:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2021

 

भारतात गेल्या 24 तासांत 1,34,154 दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद झाली.

देशात सलग सातव्या दिवशी 2 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या शासनांनी मिळून एकत्रितपणे केलेल्या परीश्रमांमुळे हा परिणाम साध्य झाला आहे.

भारतात सक्रीय रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. आज 17,13,413 सक्रीय रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात सक्रिय रूग्णसंख्येत एकूण 80,232  इतकी घसरण झाली. आता देशातील सक्रीय रुग्ण संख्या एकूण बाधित रुग्णांच्या 6.02% आहे.

दैनंदिन बरे झालेल्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत सलग 21व्या दिवशी अधिक आहे. गेल्या 24 तासांत 2,11,499 जण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 77,345  हून अधिक रूग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

या महामारीची लागण झाल्यापासून, संसर्ग झालेल्या लोकांपैकी 2,63,90,584 नागरिक कोविड-19 या आजारातून बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 2,11,499 रूग्ण बरे झाले आहेत. एकूण रूग्ण बरे होण्याचा दर 92.79%,इतका आहे, जो सातत्याने वाढता कल दर्शवित आहे.

गेल्या 24 तासात एकूण 21,59, 873 चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण 35.3 कोटी ( 35,37,82,648) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात एकीकडे चाचण्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, तसेच साप्ताहिक पॉझिटिव्हिटीच्या दरात सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दर सध्या 7.66% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटीचा दर कमी झाला असून  तो आज 6.21% वर आहे. सलग दहा दिवस तो 10% पेक्षा कमी आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आज देशभरात एकूण संख्या 22.10 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 22,10,43,693 लसीच्या मात्रा 31,24,981 सत्रांद्वारे दिल्या गेल्या आहेत.

त्या पुढील आलेखात समाविष्ट आहेत

HCWs

1st Dose

99,12,522

2nd Dose

68,15,468

FLWs

1st Dose

1,58,49,178

2nd Dose

85,84,162

Age Group 18-44 years

1st Dose

2,26,12,866

2nd Dose

59,283

Age Group 45 to 60 years

1st Dose

6,78,84,028

2nd Dose

1,09,73,523

Over 60 years

1st Dose

5,94,06,566

2nd Dose

1,89,46,097

Total

22,10,43,693

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1724018) Visitor Counter : 202