आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 1.32 लाख


सलग सहाव्या दिवशी दैनंदिन नवीन रूग्णसंख्या 2 लाखांहून कमी

सक्रीय रुग्णसंख्या 17,93,645;  सलग दुसऱ्या दिवशी सक्रिय रूग्णसंख्या 20 लाखांपेक्षा कमी

दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत सलग 20 व्या दिवशी जास्त

बरे होण्याचा दर आणखी वाढून 92.48%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 6.57% इतका असून सलग 9 व्या दिवशी तो 10% पेक्षा कमी

Posted On: 02 JUN 2021 2:36AM by PIB Mumbai

 

भारतातील दैनंदिन नवीन रुणांच्या संख्येमध्ये सतत घसरण झालेली आढळून येत असून, भारतात गेल्या 24 तासात 1.32 लाख इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात दैनंदिन 1,32,788 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात सलग 6 व्या दिवशी 2 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001ZP4Q.jpg

भारतात दैनंदिन नवीन सक्रीय रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत आहे. आज 17,93,645 सक्रीय रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात सक्रिय रूग्णसंख्येत एकूण 1,01875 इतकी घसरण झाली, आता सक्रीय रुग्ण संख्या एकूण बाधित रुग्णांच्या 6.34% आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002WC1N.jpg

दैनंदिन बरे झालेल्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत सलग 20 व्या दिवशी जास्त आहे. गेल्या 24 तासांत 2,31,456 जण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 98,668 हूनअधिक जण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0036R8V.jpg

या महामारीची लागण झाल्यापासून संसर्ग झालेल्या लोकांपैकी 2,61,79,085 नागरीक कोविड-19 या आजारातून मुक्त झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 2,31,456 रूग्ण बरे झाले आहेत. एकूण रूग्ण बरे होण्याचा दर 92.48%,इतका आहे, जो सातत्याने वाढता कल दर्शवित आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0046YH4.jpg

गेल्या 24 तासात एकूण 20,19, 773 चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण 35 कोटी ( 35,00,57,330) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात एकीकडे चाचण्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, तसेच साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दरात सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दर सध्या 8.21% वर आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटीचा दर कमी झाला असून  तो आज 6.57% वर आहे. आता सलग 9 व्या दिवशी तो  10% पेक्षा कमी आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आज देशभरात एकूण संख्या 21.85 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 21,85,46,667 लसीच्या मात्रा 30,91,543 सत्रांद्वारे दिल्या गेल्या आहेत.

त्या पुढील आलेखात समाविष्ट आहेत

HCWs

1st Dose

98,99,574

2nd Dose

68,03,865

FLWs

1st Dose

1,57,63,082

2nd Dose

85,56,719

Age Group 18-44 years

1st Dose

2,13,73,965

2nd Dose

39,443

Age Group 45 to 60 years

1st Dose

6,72,19,095

2nd Dose

1,08,65,046

Over 60 years

1st Dose

5,91,55,780

2nd Dose

1,88,70,098

Total

21,85,46,667

 

***

S.Tupe/S.Patgoankar/P.Kor

एचएफडब्ल्यू / राज्यनिहाय  कोविड स्थिती बाबत  माहिती/ जून 2021/2

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1723706) Visitor Counter : 188