आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ 2021 निमित्त डॉ. हर्षवर्धन यांनी तंबाखूपासून दूर राहण्याची दिली प्रतिज्ञा


“तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध”-ही “जागतिक तंबाखू विरोधी दिन ” 2021 ची संकल्पना

“पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ई-सिगारेटच्या धोक्याविरोधात देशव्यापी चळवळ”

“विनामूल्य क्विटलाइन सेवा आता 16 भाषांमध्ये उपलब्ध, लोकांनी वर्तन बदलावे आणि तंबाखूचे सेवन सोडून द्यावे : डॉ हर्ष वर्धन यांचे आवाहन

Posted On: 31 MAY 2021 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2021

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज एका कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले होते आणि त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला तंबाखूपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा दिली. आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. अश्विनीकुमार चौबे या कार्यक्रमात डिजिटल माध्यमातून सहभागी झाले होते.

अत्यंत योग्य वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत मंत्री म्हणाले की, ''भारतात, दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे सुमारे  1.3  दशलक्ष तर प्रति दिन 3500 जणांचा मृत्यू होतो, यामुळे निर्माण होणारा  सामाजिक आणि आर्थिक ताण बऱ्याच अंशी टाळता येण्यासारखा आहे. याशिवाय, तंबाखू सेवनामुळे होणारे  मृत्यू आणि आजारांव्यतिरिक्त तंबाखूचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावरही होतो''. धूम्रपान करणाऱ्यांना  कोविड  -19 मुळे गंभीर आजार होऊन मृत्यूचा 40-50% जास्त उच्च धोका आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.''भारतात तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यूंमुळे चुकवावी लागणारी आर्थिक किंमत'' या शीर्षकाखाली जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार , असा अंदाज लावला जात आहे कीभारतात तंबाखूच्या सेवनामुळे  आणि वापरामुळे होणारे आजार आणि मृत्यूंमुळे 1.77 लाख कोटी रुपयांचा मोठा आर्थिक बोजा पडतो , तो जीडीपी अर्थात  सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या जवळपास १% आहे.

सरकार आणि राज्य सरकारांच्या निरंतर प्रयत्नांमुळे तंबाखू सेवनाचे प्रमाण 2009-10 मध्ये असलेल्या 34.6%  तुलनेत सहा टक्क्यांनी कमी होऊन 2016-17.मध्ये 28.6% राहिले.

तंबाखूच्या सेवनाला आळा घालण्याच्या सरकारच्या खंबीर राजकीय बांधिलकीवर बोलताना ,ते म्हणाले की, जेव्हा मी जेव्हा केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा  ई-सिगारेटच्या धोक्यावर मात करण्याचे मी निश्चित केले, आणि ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स बंदी विधेयक, 2019 ’ची संकल्पना मांडली.

या विधेयकामध्ये  ई-सिगरेटचे उत्पादन, निर्मिती , आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक  आणि जाहिरात करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या अनुकरणीय अशा नेतृत्वाखाली वेगवेगळ्या भागधारकांना खात्री पटवून देण्यात आली आणि 2019 मध्ये संसदेने हे विधेयक सहजतेने मंजूर केले.

डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी तंबाखू सेवन सोडण्यासाठीच्या  क्विटलाइन सेवांच्या दूरध्वनी क्रमांकाचा  प्रसार अधोरेखित केला. आपण -1800-112-356 हा क्रमांक असलेली विनामूल्य क्विटलाइन सेवा  2016 मध्ये सुरु केली, सप्टेंबर 2018 मध्ये या सेवेचा विस्तार करण्यात आला. क्विटलाइन सेवा आता 16  भाषांमध्ये आणि अन्य  4 केंद्रांवर स्थानिक बोलीभाषेत उपलब्ध आहे. या क्विटलाइन सेवेचा विस्तार होण्यापूर्वी येणाऱ्या दूरध्वनी संपर्कांची संख्या प्रतिमहिना  20,500 होती आता या सेवेचा विस्तार झाल्यानंतर ही संख्या वाढून दर महिन्याला 2.50 लाख दूरध्वनी संपर्कांपर्यंत पोहोचली आहे.''तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडून द्यावे असे आवाहन त्यांनी लोकांना पुन्हा एकदा केले आहे''

तंबाखू नियंत्रणासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017च्या महत्वाकांक्षी उद्दीष्टांवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यावेळी भाष्य केले, ते म्हणाले की, "आम्ही 2025 पर्यंत तंबाखूचा वापर 30% कमी करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट  ठेवले आहे".

तंबाखूच्या सेवनाला  आळा घालण्याच्या दृष्टीनें  आतापर्यंत झालेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी अन्य सर्व भागीदार संस्था, मंत्रालय अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी  आणि विशेषतः  जागतिक आरोग्य संघटनेचे आभार मानले.

2021 मध्ये  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तंबाखू नियंत्रणासाठी केलेल्या कार्याची आणि त्यांनी दिलेल्या   सेवेची दखल घेऊन 2021 चा महासंचालकांचा विशेष मान्यता पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या  महासंचालकांचे आभार मानले.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1723140) Visitor Counter : 362