आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात नव्या रुग्ण संख्येचा घटता कल जारी राखत 1.52 लाख दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद


गेल्या 50 दिवसातल्या सर्वात कमी दैनंदिन नव्या रुग्णसंख्येची नोंद

गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णसंख्येत 88,416 ने घट होऊन एकूण संख्या झाली 20,26,092

सलग 18 व्या दिवशी, दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ होऊन हा दर झाला 91.60%

चाचण्यांच्या क्षमतेत वाढ- आतापर्यंत 34.48 कोटी चाचण्या करण्यात आल्या

राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत 21.3 कोटी पेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 31 MAY 2021 10:38AM by PIB Mumbai

भारतात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येचा घटता कल जारी राखत 1.52 लाख या गेल्या 50 दिवसातल्या सर्वात कमी दैनंदिन नव्या रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

सलग चौथ्या दिवशी देशात 2 लाखापेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात 1,52,734  नव्या रुग्णांची नोंद झाली.

 


भारतात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून ही संख्या आज  20,26,092 झाली आहे.

गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णसंख्येत 88,416 ने घट झाली असून उपचाराधीन रुग्ण, देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 7.22% आहेत.

 


सलग 18 व्या दिवशी, दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 2,38,022 रुग्ण बरे झाले.


महामारीच्या सुरवातीपासूनच्या कोरोना बाधितामधून  2,56,92,342 लोक कोरोनातून बरे झाले असून गेल्या 24 तासात 2,38,022 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर    91.60% झाला आहे.
 

गेल्या 24 तासात 16,83,135 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत 34.48 कोटी चाचण्या केल्या आहेत. 

देशभरात चाचण्यांच्या संख्येत वाढ होत असतानाच साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दरामध्ये सातत्याने घट होत आहे. साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 9.04% असून दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 9.07 % आहे. सलग 7 व्या दिवशी हा दर 10 % पेक्षा कमी आहे.

 


राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत 21.3 कोटी पेक्षा जास्त  लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 30,28,295 सत्राद्वारे एकूण  21,31,54,129 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये यांचा समावेश आहे-

HCWs

1st Dose

98,67,310

2nd Dose

67,76,644

FLWs

1st Dose

1,55,92,325

2nd Dose

84,97,120

Age Group 18-44 years

1st Dose

1,89,64,595

2nd Dose

10,058

Age Group 45 to 60 years

1st Dose

6,56,60,693

2nd Dose

1,05,74,441

Over 60 years

1st Dose

5,85,28,448

2nd Dose

1,86,82,495

Total

21,31,54,129

 

 

***

ST/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723075) Visitor Counter : 189