अर्थ मंत्रालय
आपत्कालीन पत हमी योजनेची वाढवली व्याप्ती - प्राणवायू निर्मितीसाठी इसीएलजीएस 4.0, इसीएलजीएस 3.0 चीही कक्षा रुंदावली आणि इसीएलजीएस 1.0 च्या व्याप्तीतही वृद्धी.
Posted On:
30 MAY 2021 11:37AM by PIB Mumbai
कोविड19 महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्योगातील विविध क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारने आपत्कालीन पत हमी योजनेची व्याप्ती खालील प्रमाणे वाढवली आहे. :
(i) इसीएलजीएस 4.0: रुग्णालये/ नर्सिंग होम्स/ दवाखाने/ वैद्यकीय महाविद्यालये यांना प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर 100% हमी कवच दिले आहे. व्याजाची मर्यादा 7.5% आहे.
(ii) रिझर्व्ह बँकेच्या 5 मे 2021 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुर्नगठनासाठी पात्र कर्जदार आणि इसीएलजीएस 1.0 अंतर्गत ज्यांनी कर्जाचा लाभ घेतला आहे, ज्याच्या व्याजाची परतफेड सुरुवातीच्या बारा महिन्यात करायची आहे आणि 36 महिन्यात मूळ रक्कम आणि व्याजाची परतफेड करायची आहे ते आता त्यांच्या इसीएलजीएस कर्जाच्या पाच वर्षांच्या कालावधीचा लाभ घेऊ शकतात.
उदाहरण, पहिले 24 महिने केवळ व्याज भरणे, मुद्दल आणि व्याज 36 महिन्यांनतर भरणे.
(iii) ज्या कर्जदारांची थकबाकी 29 फेब्रूवारी 2020 पर्यंत 10 टक्क्यांपर्यंत आहे त्यांना रिझर्व्ह बँकेच्या 5 मे 2021 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार इसीएलजीएस 1.0 पुनर्गठन अंतर्गत अतिरिक्त इसीएलजीएस सहाय्य केले जाईल.
(iv) इसीएलजीएस 3.0 अंतर्गत पात्रतेसाठीची 500 कोटी रुपये कर्जावरच्या थकबाकीची कमाल मर्यादा काढली आहे. प्रत्येक कर्जदाराला दिले जाणारे कमाल अतिरिक्त इसीएलजीएस सहाय्य 40% किंवा 200 कोटी रुपये, यापैकी कमी असेल ते, इतके मर्यादीत केले आहे.
(v) नागरी हवाई वाहतुक क्षेत्र इसीएलजीएस 3.0 अंतर्गत पात्र आहे.
vi) इसीएलजीएसची वैधता 30.09.2021 पर्यंत किंवा 3 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या हमी इतकी वाढवली आहे. योजनेअंतर्गत वाटपाच्या कामाला 31.12.2021 पर्यंत मंजूरी दिली आहे.
इसीएलजीएस मधे केलेल्या बदलांमुळे योजनेची उपयुक्तता वाढेल. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सुरक्षित वातावरण मिळेल तसेच उद्योगांच्या सुलभ कार्यान्वहनासाठी मदत होणार आहे. या बदलांमुळे वाजवी अटींवर संस्थात्मक पतपुरवठा करणे सुलभ होईल.
या संबंधित सविस्तर तपशील, मार्गदर्शक सूचना राष्ट्रीय पत हमी विश्वस्त संस्थेने (NCGTC) जारी केल्या आहेत.
******
MV/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722882)
Visitor Counter : 274