PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 26 MAY 2021 9:20PM by PIB Mumbai

 

  • Nationwide Cumulative Vaccination Coverage crosses landmark of 20 Crore
  • 42 percent population above 60 years have received at least 1st dose of the COVID19 vaccine
  • Daily Recoveries continue to outnumber Daily New Cases for 13th consecutive day
  • Recovery Rate further increases to 89.66%
  • Highest ever 22.17 lakh Tests conducted in a single day
  • Weekly Positivity Rate currently at 11.45%

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

View image on Twitter

नवी दिल्‍ली/मुंबई, 26 मे 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

भारतात सलग दहाव्या दिवशी दैनंदिन नवीन रूग्णसंख्या 3  लाखांहून कमी झाल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासांत 2,08,921 दैनंदिन नवीन रूग्णांची नोंद केली गेली. सक्रीय रूग्णांची एकूण संख्या, देखील कमी होऊनआता 24,95,591 इतकी झाली आहे. 10 मे 2021 रोजी  सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली होती, त्यानंतर मात्र सक्रिय रूग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत 91,191 इतकी घट झाली. देशातील सक्रीय रूग्णांची संख्या आता एकूण बाधित रुग्णांच्या 9.19% इतकी आहे.

सलग 13 व्या दिवशी, भारतातील दैनंदिन कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या, दैनंदिन रुग्णांपेक्षा अधिक आहे.  गेल्या 24 तासांत 2,95,955 रुग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद केली गेली. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आणखी वाढून 89.66% पर्यंत पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 22,17,320 चाचण्या करण्यात आल्या असून एकाच दिवसात करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या या सर्वाधिक चाचण्या आहेत, आतापर्यंत एकूण 33,48,11,496 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 11.45% वर आहे तर दैनिक पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे आणि आज तो 9.42% वर आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा दर 10% पेक्षा कमी राहिलेला आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत देशभरात राबविल्या जाणाऱ्या कोविड -19 लसींच्या एकूण मात्रांनी 20 कोटींचा टप्पा ओलांडल्यामुळे भारताने आपल्या लसीकरण मोहिमेत एक नवीन टप्पा गाठला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 20,06,62,456 लसींच्या मात्रा  28,70,378 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यात 97,96,058 आरोग्य कर्मचारी ज्यांनी पहिली मात्रा घेतली आहे , 67,29,213 आरोग्य कर्मचारी ज्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली यांचा समावेश आहे, 1,51,71,950 आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर, 83,84,001आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे.18 - 44 वयोगटातील 1,29,57,009 लाभार्थी (पहिली मात्रा), 45 ते 60 वर्षे वयोगटातील 6,20,88,772 लाभार्थी (पहिली मात्रा) 1,00,30,729 लाभार्थी (दुसरी मात्रा), 60 पेक्षा अधिक वयोगटातील 5,71,35,804 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,83,68,920 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महाराष्‍ट्र अपडेट:

मुंबईत निवास करणाऱ्या एक लाखांहून अधिक नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेने मागवलेल्या जागतिक निविदा प्रक्रियेत आणखी तीन लस पुरवठादारांनी प्रतिसाद नोंदवला आहे. महानगरपालिकेकडे आलेल्या 8 प्रस्तावांपैकी 7 पुरवठादारांनी स्पुटनिक लाईट लस पुरविण्यात रस दाखविला आहे तर उर्वरित एका पुरवठादाराने अॅस्ट्रा झिनिका आणि फायझर लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे मुंबईला लस पुरविण्यासाठी सक्षम पुरवठादारांची एकूण संख्या आता 8 झाली आहे. नाशिक महानगरपालिकेने लसीकरण मोहीम चालविण्यासाठी तातडीने स्पुटनिक लसीच्या 5 लाख मात्रा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

गोवा अपडेट:

गोवा राज्यसरकारने सर्व पंचायती आणि महानगरपालिकांमध्ये “टिका उत्सव” अर्थात लसीकरण महोत्सवाची सुरुवात केली आहे. गोव्यातील 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावरच लाभार्थ्यांची थेटपणे नोंदणी होईल आणि या प्रक्रियेत स्तनदा माता तसेच सह्व्याधी असणाऱ्या रुग्ण लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.

IMPORTANT TWEETS

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1721969) Visitor Counter : 344


Read this release in: English , Hindi , Punjabi