आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 24,95,591 वर पोहोचली आहे
2.08 लाखांपेक्षा कमी रूग्ण, नवीन रूग्णसंख्येतील घट कायम
गेल्या 24 तासांत सक्रीय रुग्णांमध्ये 91,191 ची घट
आतापर्यंत देशभरात कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 2,43,50,816 वर पोहोचली, गेल्या 24 तासांत सुमारे 3 लाख जण कोविडमुक्त
सलग 13 व्या दिवशी, दैनंदिन कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा अधिक
रूग्ण बरे होण्याच्या दरात आणखी वाढ होत तो 89.66%
एकाच दिवसात सर्वाधिक 22.17 लाख चाचण्या
साप्ताहिक पॉसिटिव्हीटी दर सध्या 11.45%
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 9.42% आहे; सलग दुसऱ्या दिवशी हा दर 10% पेक्षा कमी
देशव्यापी लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा केला पार
Posted On:
26 MAY 2021 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2021
भारतात सलग दहाव्या दिवशी दैनंदिन नवीन रूग्णसंख्या 3 लाखांहून कमी झाल्याची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत 2,08,921 दैनंदिन नवीन रूग्णांची नोंद केली गेली.
सक्रीय रूग्णांची एकूण संख्या, देखील कमी होऊनआता 24,95,591 इतकी झाली आहे. 10 मे 2021 रोजी सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली होती, त्यानंतर मात्र सक्रिय रूग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे.
गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत 91,191 इतकी घट झाली. देशातील सक्रीय रूग्णांची संख्या आता एकूण बाधित रुग्णांच्या 9.19% इतकी आहे.
सलग 13 व्या दिवशी, भारतातील दैनंदिन कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या, दैनंदिन रुग्णांपेक्षा अधिक आहे.
गेल्या 24 तासांत 2,95,955 रुग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद केली गेली. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आणखी वाढून 89.66% पर्यंत पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत 22,17,320 चाचण्या करण्यात आल्या असून एकाच दिवसात करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या या सर्वाधिक चाचण्या आहेत, आतापर्यंत एकूण 33,48,11,496 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 11.45% वर आहे तर दैनिक पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे आणि आज तो 9.42% वर आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा दर 10% पेक्षा कमी राहिलेला आहे.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत देशभरात राबविल्या जाणाऱ्या कोविड -19 लसींच्या एकूण मात्रांनी 20 कोटींचा टप्पा ओलांडल्यामुळे भारताने आपल्या लसीकरण मोहिमेत एक नवीन टप्पा गाठला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 20,06,62,456 लसींच्या मात्रा 28,70,378 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यात 97,96,058 आरोग्य कर्मचारी ज्यांनी पहिली मात्रा घेतली आहे , 67,29,213 आरोग्य कर्मचारी ज्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली यांचा समावेश आहे, 1,51,71,950 आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर, 83,84,001आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे.18 - 44 वयोगटातील 1,29,57,009 लाभार्थी (पहिली मात्रा), 45 ते 60 वर्षे वयोगटातील 6,20,88,772 लाभार्थी (पहिली मात्रा) 1,00,30,729 लाभार्थी (दुसरी मात्रा ), 60 पेक्षा अधिक वयोगटातील 5,71,35,804 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,83,68,920 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.
HCWs
|
1st Dose
|
97,96,058
|
2nd Dose
|
67,29,213
|
FLWs
|
1st Dose
|
1,51,71,950
|
2nd Dose
|
83,84,001
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
1,29,57,009
|
Age Group 45 to 60 years
|
1st Dose
|
6,20,88,772
|
2nd Dose
|
1,00,30,729
|
Over 60 years
|
1st Dose
|
5,71,35,804
|
2nd Dose
|
1,83,68,920
|
Total
|
20,06,62,456
|
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721859)
Visitor Counter : 319