आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड मदतकार्याविषयी अद्ययावत माहिती
आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना 17,831 ऑक्सिजन काँसेन्ट्रॅटर्स, 18,111 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन उत्पादन संयंत्रे, 13,489 व्हेंटिलेटर्स/बाय पॅप, सुमारे 6.9 लाख रेमडेसीविर कुप्या, सुमारे 12 लाख फॅविपीरावीर च्या गोळ्या पाठवल्या/पोचवल्या गेल्या
Posted On:
26 MAY 2021 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2021
भारत सरकारला 27 एप्रिल 2021पासून आंतरराष्ट्रीय सहकार्या अंतर्गत विविध देशांकडून तसेच संस्थांकडून कोविड उपचारासाठी वैद्यकीय साधनसामुग्री व उपकरणे मिळत आहेत. या साधन सामुग्रीचे राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना त्वरित वितरण होत आहे.
27 एप्रिल 2021 पासून 25 मे 2021 पर्यंत 17,831 ऑक्सिजन काँसेन्ट्रॅटर्स, 18,111 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन उत्पादन संयंत्रे, 13,489 व्हेंटिलेटर्स/बाय पॅप, सुमारे 6.9 लाख रेमडेसीविर कुप्या व 12 लाख फॅविपीरावीर च्या गोळ्या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना रस्ते व हवाई मार्गाने पाठवल्या/पोचवल्या गेल्या आहेत.
24/25 मे 2021 रोजी वोल्फसबर्ग (जर्मनी), कुवैत (भारतीय समुदाय व रेड क्रेसंट सोसायटी), ब्रिटिश ऑक्सिजन कंपनी (इंग्लंड), यु. एस. आय. एस. पी. एफ., सी. आय. आय. भारतीय व्यापार मंच (दक्षिण आफ्रिका), वर्ल्ड इन हार्मनी स्वयंसेवी संस्था (स्पेन) व भारतीय दूतावास (माद्रीद) यांच्याकडून आलेली मदत पुढीलप्रमाणे:
Consignments
|
Quantity
|
Oxygen Concentrators
|
76
|
Oxygen Cylinders
|
1,810
|
Ventilators/Bi-PAP/CPAP
|
40
|
संबंधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना, तसेच संस्थांना सातत्याने या मदतीचे प्रभावी व त्वरित विभाजन तसेच योजनाबद्ध वितरण केले जाते आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय या संपूर्ण प्रक्रियेची बारकाईने व नियमितपणे देखरेख करत आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणून अनुदान, मदत आणि देणगी स्वरूपात कोविड मदतसामुग्री प्राप्त झाल्यानंतर वाटपाच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष 26 एप्रिल 2021 पासून कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाने 2 मे 2021 पासून प्रमाणित कार्यान्वयन नियमावली (SOP) तयार केली आणि अंमलात आणली आहे.
* * *
S.Tupe/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721897)
Visitor Counter : 281