रेल्वे मंत्रालय
कोविड आव्हाने असूनही रेल्वेची मालवाहतुकीत दोन अंकी वाढ कायम
वर्ष 2019-20 च्या तुलनेत मालवाहतुकीत 10% वाढ
मे 2021 मध्ये भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून केली 9278.95 कोटी रुपयांची कमाई
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2021 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2021
कोविड विरुद्ध विलक्षण लवचिकता दर्शवित भारतीय रेल्वेने मालवाहतुकीत दोन अंकी वाढ नोंदविली आहे. 2021 च्या मे महिन्यात भारतीय रेल्वेसाठी मालवाहतूक आकडेवारीची कमाई आणि लोडिंगच्या बाबतीत वेग कायम आहे.
वर्ष 2019-20 च्या तुलनेत रेल्वेने मालवाहतुकीत 10% पेक्षा जास्त वाढ नोंदविली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतीय रेल्वेने एकूण 203.88 दशलक्ष टन ( एम टी)मालवाहतूक केली जी आर्थिक वर्ष 2019-20 च्या याच कालावधीमधील मालवाहतूक आकडेवारीपेक्षा (184.88 एम टी) 10% जास्त आहे.
मिशन मोडवर, भारतीय रेल्वेची मे 2021 महिन्यासाठी मालवाहतूक 92.29 एम टी आहे जी मे 2019 (83.84 एम टी) पेक्षा 10% जास्त आहे आणि याच कालावधीत मे 2020 (64.61 एम टी) पेक्षा 43% जास्त आहे.
मे 2021 मधील मालवाहतुकीत प्रामुख्याने 97.06 दशलक्ष टन कोळसा, 27.14 दशलक्ष टन लोह खनिज, 7.89 दशलक्ष टन अन्नधान्य, 5.34 दशलक्ष टन खते, 6.09 दशलक्ष टन खनिज तेल, 11.11 दशलक्ष टन सिमेंट ( विटा वगळता) आणि 8.2 दशलक्ष टन विटांचा समावेश होता.
मे 2021 मध्ये भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून केली 9278.95 कोटी रुपयांची कमाई केली.
या महिन्यात बोगी परतण्याच्या कालावधीत 27% वाढ दिसून आली आहे. मे, 2021 मध्ये बोगी परतण्याचा कालावधी 4.83 दिवस होता जो झाली असून मे 2019 मध्ये 6.61 होता.
रेल्वे मालवाहतूक अत्यंत आकर्षक करण्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये बऱ्याच सोयी / सवलतीही दिल्या जात आहेत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
विद्यमान नेटवर्कमध्ये मालवाहू गाड्यांची गती वाढविण्यात आली आहे याची नोंद घ्यावी लागेल.
माल वाहतुक वेग सुधारणेमुळे सर्व हितधारकांच्या पैशांची बचत होत आहे. गेल्या 18 महिन्यांत वाहतुकीचा वेग दुपटीने वाढला आहे.
काही परिमंडळात (सुमारे सहा परिमंडळ) मालवाहतूक करणार्या गाड्यांचा सरासरी वेग 50 किमी पेक्षा अधिक आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे, काही विभाग मालवाहतूक करणार्या गाड्यांना जास्त वेगाची परवानगी देतात. मे 2021 मध्ये मालवाहू गाड्यांचा सरासरी वेग ताशी 45.42 किमी नोंदविण्यात आला जो याच कालावधीत ताशी 36.84 किमी च्या तुलनेत 23% जास्त आहे.
कोविड 19 चा उपयोग भारतीय रेल्वेने सर्वांगीण कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्याची संधी म्हणून केला आहे.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1721901)
आगंतुक पटल : 283