ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
देशभरात पीएमजीकेएवाय योजना गतिमान
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (पीएमजीकेएआय) लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याच्या योजनेमुळे लाभार्थ्यांना सध्याच्या कोविड काळात मोठा दिलासा दिला आहे
Posted On:
25 MAY 2021 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2021
24 मे 2021 पर्यंत एफसीआयने सर्व 36 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 48 लाख मे . टन मोफत धान्य पुरवठा केला आहे.
देशात धान्य पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी एफसीआयने वाहतुकीबाबत आगाऊ नियोजन केले आहे. वाटप केलेला साठा उचलल्यावर तो पुन्हा नियमितपणे भरला जातो जेणेकरून सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशात पुरेसे अन्नधान्य उपलब्ध राहील. मे 2021 दरम्यान, एफसीआयने यापूर्वीच 1062 रेक्स म्हणजेच दररोज सरासरी 44 रेक्स पाठवले आहेत. सध्या केंद्रीय साठयाअंतर्गत 295 लाख मे टन गहू आणि 597 लाख मे टन तांदूळ (एकूण 892 लाख मे टन) धान्य उपलब्ध आहे.
कोविड महामारी काळात 25 मार्च 2020 पासून, एफसीआयने विविध सरकारी योजनांतर्गत एकूण 1062 लाख मे टन धान्य दिले आहे.
गरीबांसाठी उपक्रम म्हणून, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (पीएमजीकेएआय) केंद्र सरकार दोन महिन्यांच्या कालावधीसाठी (मे-जून 2121) प्रत्येक व्यक्तीला दरमहा 5 किलो धान्य वितरित करत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत 79.39 कोटी लाभार्थी आहेत. हे वाटप नियमित एनएफएसए वाटपाव्यतिरिक्त आहे आणि या योजनेअंतर्गत 79.39 लाख मे टन अन्नधान्य देण्यात येणार आहे.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721693)
Visitor Counter : 248