आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्यांकडून काळ्या बुरशीबाबत आलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लिहिले पत्र
बुरशीजन्य संसर्गाला प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी रुग्णालयात संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण आणि स्वच्छता विषयक बाबींचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे
Posted On:
21 MAY 2021 8:34PM by PIB Mumbai
गेल्या काही दिवसात काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी काळी बुरशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्युकर मायकोसीस या रोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कळवले आहे. कोविड रुग्णांच्या सध्याच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हे दुय्यम बुरशीजन्य वाढते संसर्ग आणि म्युकर मायकोसीस हे चिंतेचे कारण ठरत असल्याची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना, संसर्ग रोखण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी त्याचबरोबर रुग्णालयातल्या स्वच्छता विषयक सज्जतेचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि प्रशासकांना केंद्रीय आरोग्य सचिवानी पत्र लिहिले आहे. कोविड रुग्णालये आणि इतर आरोग्यसेवा देणाऱ्या सुविधांमध्ये संसर्गाला प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी खालील बाबींची खातरजमा करावी असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
- रुग्णालय संसर्ग नियंत्रण समिती स्थापन/ कार्यान्वित करावी आणि संस्थेचे अध्यक्ष किंवा प्रशासक याच्या प्रमुखपदी असतील.
- संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण नोडल अधिकारी नियुक्त करावा, शक्यतो सूक्ष्मजीव संशोधक किंवा संसर्ग नियंत्रण विभागातली वरिष्ठ परिचारिका
- आरोग्य देखभाल सुविधांमध्ये संसर्ग आणि नियंत्रणासाठी असणाऱ्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांमध्ये केलेल्या मार्गदर्शनानुसार (https://www.mohfw.gov.in/pdf/National%20Guidelines%20for%20IPC%20in%20HCF%20-%20final(1).pdf इथे उपलब्ध ) संसर्ग प्रतिबंध नियंत्रण (आयपीसी ) कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.
यामध्ये खालील महत्वाच्या घटकांचा समावेश आहे –
.. संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण नियम पुस्तिका
..एन्टीमायक्रोबियलचा वापर आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक सूचना
.. शैक्षणिक कार्यक्रम आणि धोरणे
.. धोक्याचे मूल्यमापन आणि त्याचे व्यवस्थापन
..नियोजन,देखरेख आणि प्रतिसाद
.. अंमलबजावणी साठी रणनीती
- कोविड-19 च्या संदर्भात आयपीसीसाठीच्या उपाय आणि पद्धतीवर भर आणि त्या बळकट करा.
सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधांमध्ये मानक पद्धतीनुसार दक्षता घ्यावी
आरोग्य कर्मचारी आणि रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून संसर्ग आधारित खबरदारी विशेष करून तुषार,हवा आणि संपर्क यादृष्टीकोनातून अतिशय दक्षता घेणे आवश्यक
- पर्यावरण सुधारा आणि पुढील सोयी पुरवा :
- जिथे हवेतील बदलांसह आवश्यक नियंत्रण प्रणाली उपलब्ध नसते तिथे ताजी हवा आणि नैसर्गिकपणे हवा खेळती राहील यावर लक्ष केंद्रित करणारे वायुवीजन.
- 1% सोडियम हायपोक्लोराइट किंवा 70% अल्कोहोल सारख्या शिफारस केलेल्या जंतुनाशकांसह, रुग्णालयाची आणि वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि साफसफाई .
- रुग्णालयाच्या परिसरात पाणी किंवा अन्नजन्य आजार रोखण्यासाठी सुरक्षित पाणी आणि अन्नपदार्थ
d. https://cpcb.nic.in/uploads/Projects/Bio-Medical-Waste/BMW-GUIDELINES-COVID_1.pdf वर उपलब्ध सीपीसीबी मार्गदर्शक सूचनांनुसार जैव-वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
- वेन्टिलेटर संबंधित न्यूमोनिया किंवा कॅथेटर संबंधित ब्लड स्ट्रीम, मूत्रमार्गात संसर्ग यासारख्या उपकरण संबंधित संसर्ग रोखण्यासाठी आयसीयूमध्ये सुधारित दृष्टिकोनासह संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण पद्धतींमध्ये वाढ करणे आवश्यक आहे.
- प्रयोगशाळेतील / रुग्णालयातील कर्मचार्यांच्या आणि समुदायाच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी क्लिनिकल प्रयोगशाळांमध्ये आणि संलग्न रूग्णालयात संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण पद्धती अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
- स्टेरॉईड उपचार सुरु असलेले आणि सहव्याधी असलेल्या कोविड 19 रुग्णांचे व्यवस्थापन करताना संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणाचे सूक्ष्म पालन (उदा मधुमेह ज्यात उत्तम ग्लाइसेमिक नियंत्रण स्थापित करणे आवश्यक आहे; यासाठीच्या मार्गदर्शक सूचना https://www.mohfw.gov.in/pdf/ClinicalGuidanceonDiabetesManagementatCOVID19PatientManagementFacility.pdf ). वर उपलब्ध आहेत. .
- योग्य वेळी, व्हेंटीलेटर संबंधित न्यूमोनिया, कॅथेटरशी संबंधित ब्लड स्ट्रीम संसर्ग, कॅथेटरशी संबंधित मूत्रमार्गावरील संसर्ग, शल्यक्रिया झालेल्या भागात संसर्ग , गॅस्ट्रो-आतड्यांच्या आजारांवर लक्ष केंद्रित करून आरोग्यसेवेशी संबंधित संसर्गावर देखरेख ठेवणे. अधिक मार्गदर्शन एम्स एचएआय नेटवर्ककडून घेतले जाऊ शकते; https://www.haisindia.com वर तपशील उपलब्ध आहे.
- रुग्णालयातील संसर्ग नियंत्रण नियमावलीत वर्णन केलेल्या कार्यपद्धती आणि प्रोटोकॉलची अंमलबजावणी करताना रुग्णालयाच्या सर्व कर्मचार्यांना त्यांच्या वैयक्तिक दैनंदिन कामाव्यतिरिक्त त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रशिक्षित करणे .
- राज्यात आयपीसी कार्यक्रमाचे मूल्यांकन आणि अभिप्राय पुरवण्यासाठी संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करणे आवश्यक आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आश्वासन देण्यात आले आहे की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आरोग्यसेवा सुविधांमध्ये संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व आवश्यक सहाय्य पुरवेल.
***
M.Chopade/S.Kane/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1720743)