अर्थ मंत्रालय

कोविड-19 साथीची दुष्कर परिस्थिती लक्षात घेत सरकारने काही बाबतींत दिली मुदतवाढ

Posted On: 20 MAY 2021 9:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2021

 

कोविड-19 साथीच्या दुष्कर परिस्थितीमुळे विविध भागीदारांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, विविध भागीदारांकडून आलेल्या विनंत्यांचा विचार करून, 'प्राप्तिकर कायदा,1961' (येथून पुढे याचा उल्लेख सदर कायदा/ हा कायदा असा असेल) याअंतर्गतच्या अनुपालनासाठीची मुदत पुढील काही बाबतींत वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे--:

  1. ‘प्राप्तिकर नियम,1962’ (येथून पुढे याचा उल्लेख सदर नियम / हे नियम असा असेल) यातील नियम 114E अंतर्गत आणि संबंधित विविध अधिसूचनांच्या अधीन राहून  31 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरावयाचे 'वित्तीय वर्ष 2020-21 साठी SFT म्हणजे 'वित्तीय व्यवहार निवेदन', आता 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरता येईल;
  2. सदर नियम 114G अंतर्गत 31 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरावयाचे 'कॅलेंडर वर्ष 2020 साठी नोंदण्यायोग्य खात्याचे निवेदन', आता 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरता येईल;
  3. सदर नियम 31A अंतर्गत 31 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरावयाचे 'वित्तीय वर्ष 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीसाठी कर वजावट निवेदन', आता 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरता येईल;
  4. सदर नियम 31 अंतर्गत 15 जून 2021 पर्यंत रोजगारदात्याला सादर करावयाचे 'फॉर्म क्र.16 मधील टीडीएस अर्थात स्रोतस्थानी कर वजावट केल्याचे प्रमाणपत्र', आता 15 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरता येईल;
  5. सदर नियम 30 आणि 37CA अंतर्गत 15 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावयाचे 'फॉर्म क्र. 24G मधील- मे 2021 साठीचे टीडीएस/टीसीएस अर्थात स्रोतस्थानी कर वजावट केल्याचे/ स्रोतस्थानी कर संकलित केल्याचे वही समायोजन निवेदन', आता 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरता येईल;
  6. सदर नियम 33 अंतर्गत 31 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावयाचे 'वित्तीय वर्ष 2020-21 साठीचे मान्यताप्राप्त सेवानिवृत्ती निधीच्या विश्वस्तांनी दिलेल्या योगदानातून झालेल्या कर वजावटीचे निवेदन', आता 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरता येईल;
  7. सदर नियम 12CB अंतर्गत 15 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावयाचे- 'एखाद्या गुंतवणूक निधीने त्याच्या भागधारकास गत वर्ष 2020-21 साठी फॉर्म क्र.64D मधील दिलेल्या उत्पन्नाविषयीचे निवेदन', आता 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरता येईल;
  8. सदर नियम 12CB अंतर्गत 30 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावयाचे- 'एखाद्या गुंतवणूक निधीने त्याच्या भागधारकास गत वर्ष 2020-21 साठी फॉर्म क्र.64C मधील दिलेल्या उत्पन्नाविषयीचे निवेदन', आता 15 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरता येईल;
  9. सदर कायद्याच्या कलम 139 च्या उपकलम (1) अंतर्गत, मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची मुदत 31 जुलै 2021 ऐवजी आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे;
  10. सदर कायद्याच्या कोणत्याही तरतुदीअंतर्गत, गत वर्ष 2020-21 साठी लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2021 ऐवजी आता 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे;
  11. सदर कायद्याच्या कलम 92E अंतर्गत, गत वर्ष 2021-22 साठी 'आंतराष्ट्रीय व्यवहार किंवा विशिष्ट निर्देशित देशांतर्गत व्यवहार सुरु करणाऱ्या व्यक्तींसाठी लेखापालांनी तयार केलेला अहवाल' सादर करण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2021 ऐवजी आता 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे;
  12. सदर कायद्याच्या कलम 139 च्या उपकलम (1) अंतर्गत, मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2021 ऐवजी आता 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे;
  13. सदर कायद्याच्या कलम 139 च्या उपकलम (1) अंतर्गत, मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी उत्पन्नाचे विवरणपत्र सादर करण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2021 ऐवजी आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे;
  14. सदर कायद्याच्या कलम 139 च्या उपकलम (4)/ उपकलम (5) अंतर्गत, मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी उत्पन्नाचे विलंबित/ सुधारित विवरणपत्र सादर करण्याची मुदत 31 डिसेंबर 2021 ऐवजी आता 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

असे स्पष्ट करण्यात येत आहे की- सदर कायद्याच्या कलम 234A च्या उपकलम (1) मधील मुद्दे क्र. (i) ते (vi) यामध्ये निर्देशित केल्यानुसार कमी झालेली एकूण उत्पन्नावरील कराची रक्कम जेथे एक लाखापेक्षा अधिक असेल अशा बाबतीत- उपरिनिर्दिष्ट मुद्दा (ix), (xii) आणि (xiii) मध्ये उल्लेखित मुदतवाढ ही सदर कायद्याच्या कलम 234A च्या स्पष्टीकरण 1 यास लागू नसेल. त्याशिवाय, या कायद्याच्या कलम 207 मधील (2) निर्दिष्ट केल्यानुसार उपकलम भारतातील निवासी व्यक्तीच्या बाबतीत तिने या कायद्याच्या कलम 140A अंतर्गत, कायद्यातील मुदतीपूर्वी (मुदतवाढ दिली नसताना) भरलेला कर हा अग्रिम कर म्हणून गणला जाईल.

दिनांक  20.05.2021 रोजी जारी केलेले CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे  F.No.225/49/2021/ITA-II मधील परिपत्रक क्र. 9/2021. सदर परिपत्रक पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे-  www.incometaxindia.gov.in

 

* * *

M.Chopade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720434) Visitor Counter : 200