रेल्वे मंत्रालय

आत्तापर्यंत सुमारे 200 ऑक्सिजन एक्सप्रेसनी अभियानस्तरावर आपला प्रवास पूर्ण केला


ऑक्सिजन एक्सप्रेसने सुमारे 12630 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन देशातल्या 775 पेक्षा जास्त टँकरद्वारे केला वितरित

Posted On: 20 MAY 2021 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2021

 

भारतीय रेल्वे, सर्व अडथळे पार करत आणि  नवनवीन उपाय शोधत द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन  देशभरातील विविध राज्यात पोहोचवत आहे.  आतापर्यंत, भारतीय रेल्वेने सुमारे 12,630 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन  देशभरातील विविध राज्यात 775 हून अधिक टँकर द्वारे वितरित केला आहे.

आतापर्यंत सुमारे 200 ऑक्सिजन एक्सप्रेसने आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना दिलासा दिला आहे.

या वृत्तापर्यंत, 45 टँकरमध्ये 784 मेट्रिक टनपेक्षा अधिक द्रवरूप ऑक्सिजन असलेल्या 10 भरलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस धावत आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेस आता दररोज 800 मेट्रिक टनपेक्षा अधिक द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन देशाला वितरित  करत आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे  उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश अशा 13 राज्यांना ऑक्सिजन पुरवत आहेत. 

या वृत्तापर्यंत  महाराष्ट्रात आतापर्यंत 521 मेट्रिक टन ऑक्सिजन, उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 3,189 मेट्रिक टन, मध्य प्रदेशमध्ये 521 मेट्रिक टन, हरियाणामध्ये 1,549 मेट्रिक टन, तेलंगणात 772 मेट्रिक टन, राजस्थानात 98 मेट्रिक टन, 641 मेट्रिक टन कर्नाटकला, उत्तराखंडमध्ये 320 मेट्रिक टन, तामिळनाडूमध्ये 584 मेट्रिक टन, आंध्र प्रदेशमध्ये 292 मेट्रिक टन, पंजाबमध्ये १११ मेट्रिक टन, केरळमध्ये 118 मेट्रिक टन आणि दिल्लीमध्ये 3,915 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजन पोहोचवण्यात आला आहे. 

अंतराचा विचार न करता, भारतीय रेल्वे पश्चिमेकडील हापा आणि मुंद्रासारखी ठिकाणे  आणि पूर्वेकडील रुरकेला, दुर्गापूर, टाटानगर, अंगुल यासारख्या ठिकाणाहून ऑक्सिजन आणून  नंतर ते गुंतागुंतीच्या  परिचालन मार्गांवरून  राज्यांना पोहोचवत आहे.

शक्य तितक्या जलद वेळेत ऑक्सिजनची मदत पोहोचावी यासाठी  ऑक्सिजन एक्स्प्रेस मालगाडी  चालवताना रेल्वे नवीन मानके आणि अभूतपूर्व मापदंड स्थापित करत आहे.

ऑक्सिजन पुरवठा स्थानांसह रेल्वेने वेगवेगळ्या मार्ग निश्चित केले आहेत आणि राज्यांच्या  गरजेनुसार स्वत:ला सज्ज ठेवत आहे. द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन  आणण्यासाठी राज्ये भारतीय रेल्वेला टँकर उपलब्ध करून देतात.

 

* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720289) Visitor Counter : 203